Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

टीम इंडियाच्या मुख्य कोचपदी अखेर या दिग्गज खेळाडूची निवड, पुढील कॅप्टन कोण असणार..?

मुंबई : टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघात बरेच बदल होणार आहेत. कर्णधार विराट कोहली याने आधीच टी-20 संघाचे कर्णधार पद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर मुख्य कोच रवी शास्री यांचा कार्यकाळ संपला असून, त्यांनी पुन्हा प्रशिक्षक पदासाठी आता इच्छुक नसल्याचे कळविले होते. अखेर त्यांच्या जागी भारताचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड याची निवड झाल्याची माहिती ‘बीसीसीआय’ने दिली आहे.

Advertisement

मागील काही दिवसांपासून ‘बीसीसीआय’ मुख्य कोचसह, बोलिंग नि फिल्डिंग कोचचा शोध घेत होती. त्यासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवातही केली होती. रवी शास्त्री यांच्यानंतर मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यासाठी द्रविडने फार काही रस दाखवला नव्हता.

Advertisement

दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडने काम पाहिले होतं. तेव्हापासून द्रविडलाच मुख्य संघाचा हेड कोच करण्याची मागणी होत होती. मात्र, राहुल द्रविड हा नॅशनल क्रिकेट अॅकेडमीच्या (National Cricket Academy) प्रमुख पदावर असल्याने तो ही संधी घेत नव्हता.

Advertisement

ज्यूनियर स्तरावरील खेळाडूंच्या निवडीसाठी आणि त्यांचा खेळ सुधारण्यासाठी राहुल काम करण्यास इच्छुक होता. अखेर काही दिवसांपूर्वीच त्याने मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला नि लगेच त्याची नियुक्तीही करण्यात आली आहे. आता त्याच्या जागी नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा प्रमुख म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, टीम इंडियाचा हेड कोच म्हणून निवड झाल्यावर द्रविड याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बीसीसीआय अध्यक्ष आणि राहुलचा माजी सहकारी सौरव गांगुलीने राहुलच्या नियुक्तीवर आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, की ‘राहुल एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने अनेक वर्ष अप्रतिम खेळ दाखवला असून नॅशनल क्रिकेट अॅकेडमीचा प्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे. आता हेड कोच होऊन तो संघाला आणखी मोठ्या यशाच्या शिखरांवर नेईल अशा मला आशा आहे.’

Advertisement

जय शाह यांनी राहुलला शुभेच्छा दिल्या ते म्हणाले, ‘भारतीय संघाचा मुख्य कोच म्हणून राहुल पेक्षा कोणताच चांगला पर्याय आमच्यासमोर नव्हता. पुढील काही काळातच टी20 आणि 50 षटकांचे असे दोन विश्वचषक असल्याने या महत्त्वाच्या स्पर्धांपूर्वी राहुलसारखा योग्य व्यक्ती मुख्य कोच संघाला मिळाला आहे. मला आशा आहे तिन्ही प्रकारात भारत अप्रतिम कामगिरी करील..’

Advertisement
Advertisement

Leave a Reply