Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारनंतर या राज्यांनीही कमी केले पेट्रोल-डिझेलचे दर, महाराष्ट्र सरकार घेणार का निर्णय..?

मुंबई : इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोदी सरकारने दिवाळी गिफ्ट दिले आहे. मोदी सरकारने दिवाळीच्या एक दिवस आधी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देताना, पेट्रोल 5 रुपये, तर डिझेलच्या दरात चक्क 10 रुपयांची कपात केली. दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करणार असल्याचे मोदी सरकारने जाहीर केले. त्यामुळे ही दरकपात झाली असून, त्याची अंमलबजावणी आजपासूनच (गुरुवारी) केली जाणार आहे.

Advertisement

पेट्रोल, डिझेलवरील उत्पादनशुल्क अनुक्रमे 5 रुपये व 10 रुपयांनी कमी होणार आहे. डिझेलवरील उत्पादन शुल्कात करण्यात आलेली कपात पेट्रोलच्या तुलनेत दुप्पट असेल. आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. या दिलासामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी होण्याची आशाही वाढली आहे.

Advertisement

दरम्यान, मोदी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत गोवा सरकारनेही तेथील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्यात पेट्रोल 7 रुपयांनी स्वस्त होणार असल्याची घोषणा केली आहे. शिवाय कर्नाटक, आसाम आणि त्रिपुरामध्येही पेट्रोलचे दर 7 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठला होता. देशातील काही ठिकाणी तर पेट्रोलचे दर 120 रूपयांच्या पुढे गेले होते.  तर डिझेलचे दरानेही शंभरी ओलांडली होती. त्यामुळे मोदी सरकारने मोठा निर्णय घेताना, पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात केलीय

Advertisement

सरकारच्या या निर्णयामुळे महागाईनं त्रस्त झालेल्या देशवासीयांना काही प्रमाणात का हाेईना, दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रानं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करावा, असं आवाहन अर्थ मंत्रालयाद्वारे करण्यात आले आहे. त्याला काही राज्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी अन्य राज्ये काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

Advertisement

आणि म्हणून पवारांचे पंतप्रधानपद हुकले; वाचा भन्नाट असा राजकीय किस्सा
अर्रर्र.. चीनला मोठा दणका, या मोठ्या कंपनीने गुंडाळला गाशा.. असा बसणार फटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply