मुंबई : जगात क्वचितच असे जोडपे असेल ज्यांच्यात मतभेद नसतील. मात्र याचा अर्थ असा नाही की या जोडप्यांमध्ये प्रेम नाही. उलट ज्या लोकांमध्ये जितके जास्त मतभेद असतात त्यामध्ये तितकेच प्रेम असते. मात्र, अशी काही जोडपी आहेत ज्यांच्यामध्ये खूप प्रेम आहे. पण कधी-कधी अनावश्यक किंवा निरर्थक गोष्टींवरून दोघांमध्ये खूप भांडण होते. ज्याचा त्यांच्या नात्यावर वाईट परिणाम होतो.
अशा लोकांमध्ये असेही दिसून येते की मारामारी आणि भांडणांमुळे त्यांचे नाते फार लवकर तुटते. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. अशा काही टिप्स वापरून तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत कायमचे हसत-खेळत, प्रेमाचे सोनेरी क्षण घालवू शकता.
राग आला तर गप्प बसा : राग आपल्या प्रेमसंबंधांसाठी खूप वाईट आहे. अनेकवेळा आपण रागाच्या भरात आपल्या जोडीदाराला काहीतरी वाईट बोलतो किंवा अनेकजण आपल्या जोडीदारावर हात उचलतात. मात्र नंतर त्यांना पश्चाताप होतो. यामुळे नाते तुटू शकते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा पूर्णपणे शांत आणि शांतच राहा.
उगाचच मोठ्याने ओरडू नका : बरेच लोक जेव्हा कधी एखाद्या गोष्टीबद्दल पार्टनरशी मतभेद होतात तेव्हा ओरडू लागतात. तुमच्या जोडीदाराला तुमचे असे ओरडणे आवडू शकत नाही. त्यामुळे तुमची ओरडण्याची सवय बदला आणि हळू बोलायला सुरुवात करा. यामुळे तुमच्या पार्टनरला चांगले वाटेल आणि तुमचे नाते मजबूत होईल.
जुनी गोष्ट धरून ठेऊ नका : अनेकांना अशी सवय असते की ते काही जुन्या गोष्टी धरून बसतात. (तुमच्या जोडीदाराने चूक केली असेल) एवढेच नाही तर प्रत्येक वेळी ते एकाच गोष्टीचा हवाला देत राहतात. पण एकदा चूक कोणाकडूनही होऊ शकते.
क्षमा करायला शिका : अनेकजण प्रत्येक वेळी आपल्या एखाद्या चुकीसाठी जोडीदाराची माफी मागतात. पण जोडीदाराची चूक झाल्यावर त्यांना माफ करू करा. असे न केल्यास तुम्ही तुमचा पार्टनर आणि तुमच्या नात्यात दरी निर्माण करू शकता. त्यामुळे क्षमा करायला शिकणे चांगले.