Take a fresh look at your lifestyle.

डेंग्यूचा डास ‘त्यावेळी’च जास्त डसतो..! पहा नेमके काय आहे याचे कारण

पुणे : सध्या महाराष्ट्रात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला आहे. कारण, डेंग्यू झाला की रुग्णालयात भरती होऊन डॉक्टर व औषध कंपन्यांची भर्ती करण्यासाठी मोठे पैसे मोजावे लागतात. त्यामुळेच डासापासून फैलावणाऱ्या आणि अनेकांसाठी जीवघेण्या ठरणाऱ्या या आजाराबद्दल आपण माहिती पाहूया.

Advertisement

भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि हवामानातील बदलामुळे डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. एवढेच नाही तर डेंग्यूच्या नव्या प्रकारांचा प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांची चिंता अधिकच वाढली आहे. डेंग्यूची एक चिंतेची बाब म्हणजे तो रोखण्यासाठी आपल्याकडे कोणतीही लस नाही. लस नसल्यामुळे डेंग्यू रोखणे हे आव्हानात्मक काम आहे. डेंग्यूचा संसर्ग एका विशिष्ट प्रकारच्या डासाच्या चावण्याने होतो. पण या डासाच्या चाव्याव्दारे सामान्य डासाच्या चाव्यात फारसा फरक दिसत नाही. त्यामुळेच या डासापासून बचाव करणे खूप महत्वाचे आहे.

Advertisement

डेंग्यूच्या डासाबद्दल अनेकदा असे म्हटले जाते की तो दिवसा जास्त सक्रिय असतो, म्हणजेच दिवसा त्याच्या चावण्याचा धोका सर्वाधिक असतो. असे म्हटले जाते की सकाळी सूर्योदयानंतर दोन तास आणि संध्याकाळी सूर्यास्त होण्यापूर्वी काही काळ ते लोकांना आपले शिकार बनवते. काहीवेळा तो सूर्यास्तानंतरही तुम्हाला चावू शकतो. याशिवाय, डेंग्यूचा डास सहसा अधिक लोकांच्या घोट्याजवळ किंवा हाताचे कोपरा इत्यादींना लक्ष्य करतो. लक्षात ठेवा या डासाच्या एका चाव्याने तुमची मरेपर्यंत झोप उडू शकते. एकदा चावल्यानंतर तुम्हाला अनेक लक्षणे दिसू शकतात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply