Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

विम्याचे कोट्यवधी रुपये लाटण्यासाठी रचला खुनी खेळ.., कोब्राचा दंश घडवून निष्पापाचा घेतला बळी..!

अहमदनगर : पैशांसाठी लोकं कोणत्या थराला जातील, काही नेम नाही. आपल्या तुंबड्या भरण्यासाठी काही जण तर इतरांच्या जिवावर उठल्याचे पाहायला मिळते. मात्र, पापाचा घडा कधी तरी भरतोच.. नि मग कायद्याच्या कचाट्यातून अशा लोकांची सुटका होत नाही..

Advertisement

असाच काहीसा प्रकार अहमदनगरमधील राजूर येथे घडल्याचे समोर आले. अमेरिकेत 20 वर्षे राहून येथे आलेल्या एकाने विम्याचे कोट्यवधी रुपये हडपण्यासाठी स्वत:च्याच मृत्यूचा बनाव रचला. त्यासाठी त्याने साथीदारांच्या मदतीने एका भोळसर, मनोरुग्ण व्यक्तीचं अपहरण करून त्याला कोब्रा नागाचा दंश घडवून त्याची हत्या केली. नंतर संबंधित मृतदेह स्वत:चाच असल्याचा बनाव करुन, तशी कागदपत्रे तयार करून विमा हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीचा प्लॅन फसला नि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. राजूर पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या पाच साथीदारांना अटक केलीय..

Advertisement

प्रभाकर वाकचौरे (कळस), हर्षद रघुनाथ लहामगे (राजूर), प्रशांत रामहरी चौधरी (धामणगाव), संदीप सुदाम तळेकर (पैठण) आणि हरीश रामनाथ कुलाळ (कोंदणी) अशी अटक केेलेल्या आरोपींची नावे आहेत.

Advertisement

मुळचा राजूर येथील मुख्य आरोपी प्रभाकर वाकचौरे हा 20 वर्षे अमेरिकेत राहून काही दिवसांपूर्वी मायदेशी आला होता. धामणगाव ही त्याची सासुरवाडी आहे. अमेरिकेत राहत असताना, त्याने एका अमेरिकन विमा कंपनीत 15 लाख डॉलरचा (11 कोटी रुपये) विमा उतरवला होता. गावी आल्यानंतर त्याने स्वत:च्या नावावरील विमा हडपण्यासाठी खुनी खेळ रचला.

Loading...
Advertisement

आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने गावातील मनोरुग्ण असणाऱ्या नवनाथ यशवंत अनाप याच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्यांनी नवनाथ अनापचं अपहरण केलं. एक दिवस डांबून ठेवल्यानंतर आरोपींनी कोब्रा या अतिविषारी नागाचा दंश घडवून त्याची हत्या केली. नवनाथ अनाप याच्या पायाजवळ कोब्रा सोडून त्याला काठीने डिवचलं. त्यामुळे आक्रमक झालेल्या कोब्राने अनाप यांच्या पायाला दंश केला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

अनाप याचा मृतदेह हा प्रभाकर वाकचौरे याचा असल्याचा बनाव करण्यात आला. राजूर पोलिसांनीही प्रभाकर वाकचौरे याच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली. नंतर आरोपींनी संबंधित कागदपत्रे मिळवून विम्यासाठी क्लेम केला, पण विम्याची रक्कम मोठी असल्याने विमा कंपनीचे अधिकारी तपासासाठी गावात दाखल झाले. त्यावेळी प्रभाकर वाकचौरे जिवंत असल्याची माहिती गावकऱ्यांनीच अधिकाऱ्यांना दिली नि सगळा बनाव उघड झाला. पोलिसांनी आरोपी वाकचौरे याला गुजरातमधून अटक केली असून, या घटनेचा पुढील तपास राजूर पोलीस करीत आहेत.

Advertisement

एसटीचा प्रवास महागला.. एसटी महामंडळाने किती दरवाढ केलीय, वाचा..
बाबा रामदेव यांना दिल्ली हायकोर्टाचा दणका, कशामुळे योगगुरु अडचणीत आलेत, नेमकं काय झालंय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply