मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आणखी एका दरवाढीची भर पडलीय..ती म्हणजे, आपल्या लाल परीचा, अर्थात एसटीचा प्रवासही आता महागला आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत एसटीच्यी तिकीट दरात 17.17 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एसटीने प्रति किलोमीटर 21 पैशांची दरवाढ केलीय. पूर्वी प्रतिकिलोमीटर 1 रुपया 24 पैसे दर होता. आता त्यासाठी 1 रुपया 45 पैसे मोजावे लागणार आहेत. बैठकीत तिकीट दरात 17.17 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तिकीटांचे नवे दर काल (ता. 25) मध्यरात्रीपासून लगेच लागू करण्यात आले आहेत. रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर 5 ते 10 रूपयांनी कमी करीत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र एसटी महामंडळाने दिलासा दिलाय.
कोरोना काळात एसटी महामंडळाला सर्वात मोठा फटका बसला. दुसरीकडे गेल्या तीन वर्षांपासून इंधनाच्या दरात सतत वाढच होत आहे. इंधनाचे दर भरमसाठ वाढत असतानाही एसटी महामंडळाने तिकिट दर वाढविले नव्हते. इंधन दरवाढीचा बोजा सहन करीत एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत होती.
कोरोना संकटात एसटीचे चाक बराच काळासाठी थांबले, त्याचा परिणाम महामंडळाच्या तिजोरीवरही झाला. अगदी कर्मचाऱ्यांचे पगार करणेही अशक्य झाले होते. अखेर नाइलाजास्तव ही तिकिट दरवाढ करावी लागत असल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे.
साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही, तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी ही भाडेवाढ नसेल. मात्र, दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किमीनंतर तिकिट दरात वाढ झाली आहे. ही दरवाढ 5 रुपयांच्या पटीत असून 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आता दिवसा व रात्री धावणाऱ्या बसेसचा तिकिट दर सारखाच असणार आहे. त्यामुळे साध्या बसचा रातराणीचा प्रवास तुलनेने स्वस्त झाल्याचे दिसत आहे.
हताश पुरग्रस्त बळीराजाला ठाकरे सरकारचा मदतीचा हात, पाहा किती कोटींची मदत केलीय..?
चीनची दंडेली सुरूच : भारताच्या एका शेजारी देशातील काही भागावर केला कब्जा.. काय आहे प्रकार..