टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली असली, तरी साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष 24 ऑक्टाेबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे. दोन्ही बाजूच्या क्रिकेट पंडितांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.
‘आयसीसी’च्या वर्ल्डकप स्पर्धेत आजवर एकदाही पाकिस्तानला भारतावर विजय मिळविता आलेला नाही. वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत भारत ७-० नं, तर टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारताने सर्व 5 सामन्यांत पाकिस्तानचा पराभव केलेला आहे.
मागील रेकाॅर्ड पाहिल्यास पाकपेक्षा भारताचे पारडे जड असल्याचेच दिसते. तसेच सध्याची टीम इंडिया यंदाच्या टी-20 वर्ल्ड कप विजेतेपदाची दावेदार असल्याचे बोलले जात आहे.
भारत-पाक सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता ताणलेली असताना, पाकिस्तानचा दिग्गज माजी कर्णधार इंझमाम उल हक याने या स्पर्धेबाबत मोठं भाष्य केलं. ‘यूएई’तील परिस्थिती उपखंडासारखीच आहे. त्यामुळे टीम इंडियाच विजेतेपदाची प्रबळ दावेदार असल्याचं इंझमामनं म्हटलंय.
तो म्हणाला, की “सराव सामन्यात भारताने इंग्लड व ऑस्ट्रेलियाचा सहज पराभव केला. भारतीय संघ उपखंडातील अशा खेळपट्ट्यांवर सर्वात घातक आहे. कोणत्याही स्पर्धेत नेमका कोणता संघ जिंकेल, असा दावा केला जाऊ शकत नाही.. पण इतर संघांच्या तुलनेत भारताच्या विजयाची शक्यता अधिक आहे..!”
“टीम इंडियात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. फलंदाजीसह बाॅलिंगही मजबूत आहे. जसजसे सामने होत जातील, तसतसे यूएईच्या खेळपट्ट्यांवर फिरकीपटूंना साथ मिळेल. त्यात रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंना मोठी मदत होईल..”, असंही इंझमाम म्हणाला.
भारत-पाक सामन्याबाबत…
भारत-पाक सामन्याबाबत इंझमाम म्हणाला, की “इतर कोणत्याही सामन्याला नसेल, इतकं महत्व या सामन्याला असेल. २०१७ मध्येही चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत-पाक सामन्याने स्पर्धेची सुरुवात नि शेवट झाला होता. मात्र, भारत-पाक सामना जो संघ जिंकेल, त्या संघाचं मनोबल प्रचंढ वाढेल नि स्पर्धेतील 50 टक्के दबाव कमी होईल..”
वाव.. दुबईत आहे टीम इंडियाचे शानदार रेकॉर्ड; पाकिस्तानलाही दिलाय झटका; पहा, कसा राहिलाय इथला ट्रेंड
नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी, पाहा कशामुळे केलीय कारवाई..?