Take a fresh look at your lifestyle.

नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या धाडी, पाहा कशामुळे केलीय कारवाई..?

कांद्याची साठेबाजी आणि त्यातून होणारी भाववाढ रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने धाडी घातल्या. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांची आयकर विभागाने कसून तपासणी केल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

कांद्याची साठेबाजी, भाववाढ आणि अचानक होणाऱ्या चढ-उतारामुळे प्राप्तिकर विभागाचे अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केल्याचे समोर येत आहे. कांद्याची आवक, खरेदी-विक्रीवर आयकर विभाग नजर ठेवून होता.

Advertisement

कांद्याची साठवणूक करुन कृत्रिम टंचाई निर्माण करुन जादा दराने कांदा विक्री केली जात असल्याच्या संशयावरून व्यापाऱ्यांवर ही धाड टाकल्याचे बोलले जाते. याबाबत उशीरापर्यंत कागदपत्रांची तपासणी सुरु होती.

Advertisement

आयकर विभागाने कमालीची गुप्तता ठेवत आज (ता. 21) सकाळपासून कांदा व्यापाराची चौकशी सुरु केली. कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आयकर विभागाने ही छापेमारी केल्याची चर्चा होती.

Advertisement

दरम्यान, आयकर विभागाने पहिल्यांदाच कांदा व्यापाऱ्यांवर छापेमारी केलेली नाही. यापूर्वीही नाशिकमधील कांदा व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर आले होते. त्यावरुन केंद्र व राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले होते.

Advertisement

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा धाडी घातल्याने नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक व्यापारी धास्तावले असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

दरम्यान, नाशिकमध्ये आज (गुरुवारी) कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या (बुधवार) तुलनेत आज बाजारात कांद्याचे भाव 200 रुपयांनी कोसळले होते, तर कांद्याचे सर्वसाधारण बाजारभाव 25 रुपयांपर्यंत आल्याचे सांगण्यात आले. कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

तुम्हाला माहितेय का गॅस सिलिंडरचीही असते एक्सपायरी डेट? तर जाणून घ्या कसे पहायचे..
‘त्या’ साठी मोदी सरकार करतेय खास प्लान; खासगी कंपन्यांचीही घेणार मदत; नागरिकांचाही होणार फायदा

Advertisement
Advertisement

Leave a Reply