ऐकावे ते नवलच : असे एकमेव रेल्वे स्टेशन की जे दोन राज्यात विभागले.. जाणून घेऊ त्या विषयी
नवी दिल्ली : भारतात अशी अनेक मनोरंजक ठिकाणे आहेत ज्याबद्दल जाणून तुम्हाला विश्वास बसणार नाही. असेच एक ठिकाण दिल्ली आणि मुंबई रेल्वे मार्गावर एक रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यांत येते. हे जाणून तुम्हाला विचित्र वाटेल. मात्र हे सत्य आहे. राजस्थानच्या झालावार जिल्ह्यात येणाऱ्या या स्टेशनवर आलेली अर्धी ट्रेन एका राज्यात तर अर्धी दुसऱ्या राज्यात उभी असते.
कोटा विभागात येणाऱ्या या स्टेशनचे नाव भवानी मंडी रेल्वे स्टेशन आहे जे राजस्थान आणि मध्य प्रदेश दरम्यान विभागलेले आहे. हे असे भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे. या अनोख्या रेल्वे स्थानकावर दोन्ही राज्यांच्या संस्कृतीची झलक दिसते. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर वसलेले हे रेल्वे स्थानक अनेक प्रकारे अतिशय खास आहे. या स्थानकाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोक तिकिटे घेण्यासाठी राजस्थानमध्ये उभे असतात आणि तिकीट देणारे लिपिक मध्य प्रदेशात बसतात.
मध्य प्रदेशातील लोकांना प्रत्येक छोट्या -मोठ्या कामासाठी भवानी मंडी स्टेशनवर यावे लागते. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या लोकांमध्ये परस्पर प्रेम आणि सौहार्द दिसून येते. राजस्थानच्या सीमेवर असलेल्या लोकांच्या घराचा पुढचा दरवाजा भवानी मंडी शहरात उघडतो, तर मागचा दरवाजा मध्यप्रदेशच्या भैंसोडा मंडीमध्ये उघडतो. दोन्ही राज्यांतील लोकांची बाजारपेठही सारखीच आहे.
दोन्ही राज्यांचा सीमावर्ती भाग अमली पदार्थांच्या व्यापारासाठी कुप्रसिद्ध आहे. मध्यप्रदेशात चोरी केल्यानंतर ते राजस्थानमध्ये पळून जातात, तर राजस्थानमध्ये चोरी करून मध्यप्रदेशात पळून जातात. सीमाभाग असल्याने तस्कर याचा पुरेपूर फायदा घेतात. त्यामुळे काही वेळा सीमेबाबत दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये वाद होतात. या रेल्वे स्टेशनच्या नावाने एक चित्रपटही बनवण्यात आला आहे. या कॉमेडी चित्रपटाचे नाव `भवानी मंडी टेसन` आहे.