Take a fresh look at your lifestyle.

असे का होतेय : ऑक्टोबर संपत आला तरी यंदा पाऊस थांबायचे नाव घेईन?

नवी दिल्ली : मान्सूनच्या परतीची प्रक्रिया साधारणपणे सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होते. परंतु, यंदा अगदी ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस थांबायचे नाव का घेईन? गेल्या वर्षीही असाच अनुभव आला होता. असे का होत असेल? जाणून घेऊया..

Advertisement

जगभरात सुरू असलेल्या हवामान बदलाचे परिणाम आता भारतातही दिसू लागले आहेत. यंदा मान्सून ज्या प्रकारे असामान्य झाला आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून महाराष्ट्रातील मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. तसेच आता केरळमध्ये पावसाने कहर केला आहे. येथे सर्व धरणे भरली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशातही गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने सतत कहर केला आहे आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

देशाच्या मोठ्या भागात जुलै ते ऑगस्ट दरम्यान पावसामध्ये बरेच अंतर दिसले. मान्सून साधारणपणे ऑगस्टपर्यंत सर्व देशभर सक्रिय होतो. त्यांनतर सप्टेंबरच्या मध्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. राजस्थानातून मान्सून माघारीची तारीख पारंपारिकपणे 17 सप्टेंबर पासून मानली जाते. या कालावधीत, पावसाच्या समाप्तीसह ओलावा कमी झाल्याची नोंद केली जाते आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागात पाऊस हळूहळू कमी होत जातो. सर्वसाधारणपणे 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून मान्सून माघारी जातो.

Advertisement

हवामान विभागाच्या मते,  यावर्षी सप्टेंबरमध्ये सक्रिय मान्सूनचा त्याच्या परतीच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. किमान तीन आठवड्यांच्या विलंबाने प्रक्रिया सुरू झाली. हवामान विभागाने ऑक्टोबरच्या सुरुवातीला जाहीर केले  की, देशाच्या पश्चिम भागातून मान्सूनची माघार 6 ऑक्टोबरपर्यंत सुरू झाली. म्हणजेच, सामान्य तारखेपासून सुमारे 20 दिवस उशीरा. यामुळे मान्सून माघार पूर्ण करण्याची तारीख आता नोव्हेंबर करण्यात आली आहे. या विलंबाचा परिणाम देशभरात ऑक्टोबरच्या मध्य आणि अखेरीस मुसळधार पावसाच्या रूपात दिसून येत आहे.

Advertisement

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी अलीकडेच म्हटले की, उत्तर केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीसह दक्षिण -पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मान्सूनलाही विलंब होत आहे. सोप्या शब्दात, अरबी समुद्राच्या कमी दाबाच्या क्षेत्रातून केरळच्या दिशेने वारे वाहत आहेत आणि यामुळे मान्सून आता समुद्राच्या क्षेत्रात परत येण्याऐवजी केरळवर थांबला आहे आणि इथे मुसळधार पाऊस पडला आहे.

Advertisement

मान्सून उशिरा परतण्यामागे हवामान बदल हेदेखील एक कारण आहे. वास्तविक, कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीवरील जागतिक तापमानवाढीचा परिणाम वाढत आहे. त्याचा प्रभाव आर्कटिक प्रदेशात सर्वाधिक जाणवत आहे, कारण येथील बर्फ खूप वेगाने वितळत आहे. यामुळे पश्चिम युरोप आणि ईशान्य चीनवर महासागरात उच्च दाबाचे क्षेत्र तयार होते. लाटा त्यांची पूर्व दिशा बदलून आग्नेय दिशेला जातात. या लाटा मान्सून हंगामाच्या अखेरीस भारतात प्रवेश करतात आणि समुद्राच्या वरच्या वातावरणात अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस पडतो.

Advertisement
Advertisement

Leave a Reply