Take a fresh look at your lifestyle.

गॅस सबसिडीबाबत मोदी सरकारचा नवा प्लॅन, पाहा आता कोणाला मिळणार सबसिडी..?

नवी दिल्ली : “बहुत हुई महॅंगाई की मार, अब की बार मोदी सरकार..’ अशी घोषणा देत २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेवर आले. काॅंग्रेसची सत्ता उलथवून लावत, महागाई कमी करण्याचे आश्वासन देत पंतप्रधान झाले. मात्र, त्यानंतर महागाई कमी होण्याऐवजी ती इतक्या वेगाने वाढली, की सर्वसामान्य नागरिकांचे जीणे मुश्किल झाले.

Advertisement

पेट्राेलने कधीच शंभरी पार केलीय, गॅस सिलिंडर हजार रुपयांवर गेला आहे. गॅस सिलिंडरवर सबसिडीच्या रुपाने मिळणारा दिलासाही आता मिळत नाही. सातत्याने वाढणाऱ्या गॅसच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. 2020-21 साली पहिल्या चार महिन्यांत मोदी सरकारने गॅसच्या सबसिडीवर 16,461 रुपये खर्च केले होते, तर या वर्षी पहिल्या चार महिन्यांत केवळ 1233 कोटी रुपये खर्च केले आहेत. या काळात गरीबांना एलपीजी सिलिंडर मोफत दिले जात होते.

Advertisement

सरकारच्या अंतर्गत सर्वेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार, आता ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरसाठी 1000 रुपये खर्च करावे लागू शकतात. कोरोना काळात जगभरात पेट्रोलियम पदार्थांच्या मागणीत घट नोंदविण्यात आली. मात्र, त्यानंतरही इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यात गॅसवरील सबसिडीदेखील बंद झाल्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलं आहे.

Advertisement

स्वयंपाकाच्या गॅस सबसिडीबाबत आता वेगळीच माहिती समोर येत आहे. त्यानुसार, मोदी सरकार आता यापुढे केवळ गरीबांनाच एलपीजी गॅसवर सबसिडी देण्याचा विचार करीत आहे.

Advertisement

एलपीजी गॅसवरील सबसिडीबाबत मोदी सरकारपुढे सध्या दोन पर्याय आहेत. त्यातला पहिला पर्याय म्हणजे, कुठल्याही वर्गाला कुठल्याही प्रकारची सबसिडीच द्यायची नाही, तर दुसरा पर्याय, म्हणजे देशातील केवळ गरीबांना सबसिडी देणं आणि इतरांना बाजारभावानुसार गॅस सिलिंडर खरेदी करायला लावणे.

Advertisement

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 लाख रुपये उत्पन्नाचा निकष कायम ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणं उज्ज्वला गॅस योजनेतील लाभार्थींसाठी ही योजना कायम राहण्याची शक्यता आहे. इतर सर्वांसाठी मात्र सबसिडी संपुष्टात येण्याचीच दाट शक्यता आहे.

Advertisement

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, कसे दिले जाणार अॅडमिशन वाचा..
मोटार वाहन कराबाबत महत्वाची बातमी, ठाकरे सरकार घेणार हा मोठा निर्णय..

Advertisement
Advertisement

Leave a Reply