Take a fresh look at your lifestyle.

खूशखबर : नौदलात तरुणांसाठी मेगा भरती; जाणून घ्या किती जागा भरणार..

नवी दिल्ली : देशसेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नौदलात आता मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय नौदलाने आर्टिफिसर अप्रेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) पदासाठी अर्ज मागविले आहेत.

Advertisement

या पदासाठी केवळ अविवाहित पुरुषांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना फेब्रुवारी 2022 पासून रुजू करून घेतले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.

Advertisement

अधिसूचनेनुसार, 10 वी आणि 12 वीच्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची या भरतीसाठी निवड केली जाईल. उमेदवाराला लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी द्यावी लागेल. जे उमेदवार सर्व टप्पे उत्तीर्ण होतील त्यांना पोस्टिंग दिले जाईल. या भरतीद्वारे भारतीय नौदल 2500 रिक्त जागा भरणार आहे. यापैकी 2000 पदे आर्टिफिसर अप्रेंटिससाठी आहेत तर 500 पदे वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) साठी आहेत.

Advertisement

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे : भारतीय लष्कराने जाहीर केलेल्या या भरतीमध्ये आर्टिफिसर अॅप्रेंटिस (एए) पदांसाठी, अर्जदाराने 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12 वी मध्ये उमेदवाराने निवडलेले विषय गणित आणि भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा संगणक विषयांपैकी एक असावेत. भरतीमध्ये वरिष्ठ माध्यमिक भरती (SSR) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने विज्ञान, जीवशास्त्र किंवा संगणक यापैकी कोणत्याही एका विषयात गणित आणि भौतिकशास्त्रासह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Advertisement

भारतीय नौदलाच्या या पदांवर अर्ज करणारा उमेदवार 1 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान जन्मलेला असावा. इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in ला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply