श्रावण सुरु झाल्यापासून अनेकांना आपल्या एका आवडीला बाजूला ठेवावे लागले होते, ते नाॅन व्हेज.. गणेशोत्सवानंतर मिळालेल्या दोन दिवसांत काहींनी आपल्या जिभेचे चोचले पुरविले, पण त्यानंतर लगेच नवरात्रोत्सवाला सुरवात झाली नि पुन्हा मांसाहार करण्यावर बंधने आली. मात्र, आता एकदाची सारी बंधने संपली असून, मांसाहार प्रेमींसाठी खऱ्या अर्थानं सुगीचे दिवस आले आहेत.
आता कोणतेही उपवास नसल्यामुळे मांसाहारावर ताव मारण्यासाठी अनेक जण सज्ज झाले आहेत. परिणामी, चिकन, मटण आणि मासे विक्रेत्यांसमोर आज (रविवार) संधी साधून मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
श्रावणामुळे मागणी नसल्याने मांसाचे दर घसरले होते. मात्र, सणवार संपताच विक्रेत्यांनी मांस, माशांच्या किंमतीत दरवाढ केली आहे. त्यामुळे खवैय्यांना या दरवाढीचा सामना करावा लागत आहे. मटण-चिकनच्या दरात जवळपास 20 रुपयांनी वाढ झालीय. पेट्रोल-डिझेल दरवाढीचाही ही परिणाम असल्याचे सांगण्यात येते.
फक्त चिकन मटणच नव्हे, तर मासळीचा दरही वाढल्याचं दिसत आहे. सलग आलेल्या उपवासानंतर मासळी बाजारांच्या दिशेनं अनेकांचीच पावलं वळली आहेत. पण, त्या ठिकाणीही दरवाढीचा सामना करावा लागत आहे.
मासे आणि चिकन- मटणमध्ये झालेली ही दरवाढ पाहता खानावळ आणि हॉटेलमध्येही उपलब्धतेनुसार दिल्या जाणाऱ्या काही खास पदार्थांच्या दरांतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं चवीनं खाणाऱ्यांना त्यांची न आवरणारी भूक ही दरवाढ पाहून काहीशी आवरती घ्यावी लागणार, हे मात्र निश्चित..!
आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ, रोहित पवार यांचा सरकारला घरचा आहेर..!
आजपासून टी-20 क्रिकेटचा विश्वचषक : जाणून घ्या आतापर्यंत कोणत्या संघांनी जेतेपद पटकावले