Take a fresh look at your lifestyle.

फेसबूकनंतर आता ही सर्वात वापरली जाणारी सेवा पडली बंद, युजर्सची झालीय मोठीच अडचण..

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच अवघा सोशल मीडिया ठप्प झाला होता. तांत्रिक चुकीमुळे फेसबूकसह त्या अंतर्गत सेवा देणाऱ्या व्हाॅटस् अॅप, इन्स्टाग्राम (Instagram) बंद पडल्याने अनेकांची अडचण झाली होती. फेसबूकला त्याचा जबर आर्थिक फटका बसला हाेता.

Advertisement

सध्याच्या डिजिटल युगात दैनंदिन वापरातील एखादी वेबसाईट डाऊन झाली, तरी युजर्सची चलबिचल सुरु होते. करोडो लोक ज्यावर अवलंबून असतात, अशा गोष्टी एकदम बंद पडल्याने अनेकांची अडचण होते. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा अनुभवास आला आहे.

Advertisement

फेसबूक (Facebook)नंतर आता इंटरनेट विश्वासातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन अशी ओळख असलेल्या गुगलची (Google) जी-मेल (Gmail) सेवा डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. नोकरी, व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात या सर्च इंजिनचा वापर केला जातो. मात्र, जी-मेलच बंद पडल्याने अनेकांची कामे खाेळंबली गेली.

Advertisement

भारतात काही ठिकाणी जी-मेल वापरण्यास काही तांत्रिक अडचणींना वापरकर्त्यांना सामोरे जावं लागत होतं. युजर्सला कोणालाही जीमेलवरुन मेल पाठविता येत नव्हता. सोबतच इनबॉक्समध्ये ई-मेलदेखील येत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

Advertisement

भारतात सर्वाधिक जी-मेल सेवेचा वापर केला जातो. खासगी कामांपासून ते कार्यालयीन कामांपर्यंत जीमेल वापरले जाते. मात्र, तेच ठप्प झाल्याने भारताला सर्वात मोठा फटका बसला.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 68 टक्के यूझर्सनी जी-मेलच्या वापरात अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. देशातील जवळपास 18 टक्के वापरकर्त्यांनी जीमेल डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत, तर 14 टक्के वापरकर्त्यांनी जीमेल लॉग इन करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले.

Advertisement

भारतात अनेक युझर्स जीमेल डाऊन झाल्याची माहिती सोशल मीडियातही देत आहेत. दरम्यान गुगलकडून जीमेल डाऊन झाल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Advertisement

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी..! पीएफ व्याजाचे पैसे लवकरच जमा होण्याची शक्यता; पहा, काय आहे सरकारचे नियोजन
अर्र.. पाकिस्तानी अर्थमंत्र्यांचे भन्नाट उत्तर; त्या युद्धांमुळे पाकिस्तानचे अब्जावधींचे नुकसान, पहा, कुणाला दिलाय दोष..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply