Take a fresh look at your lifestyle.

फक्त एक रुपया लिटर पेट्राेल..! आपल्या शेजारील देशांमधील इंधनाचे दर पाहून तोंडात बोटे घालाल..!

नवी दिल्ली : वाढत्या इंधनदरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. देशातील बहुतेक शहरांत पेट्रोलच्या दराने कधीच शंभरी पार केली आहे. तेल कंपन्यांनी आजही (ता.7) पेट्रोलच्या दरात लिटरमागे 30 पैसे, तर डिझेलच्या दरात 35 पैशांची वाढ केली. वाढत्या इंधन दरामुळे नागरिक सरकारवर नाराज झाले आहेत.

Advertisement

भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची दोन मुख्य कारणे आहेत. एक तर कच्च्या तेलाची किंमत नि दुसरे म्हणजे त्यावरील कर… पेट्रोल-डिझेलवर केंद्रीय उत्पादनशुल्क आणि विविध राज्यांकडून कर आकारले जातात. परिणामी, त्याची किंमत वाढत जाते. सध्या पेट्रोल-डिझेलवर व्हॅट आणि एक्साइज ड्युटीसह 60 टक्क्यांहून अधिक कर लावला जात आहे.

Advertisement

भारतात इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे डोळे पांढरे होण्याची वेळ आलेली असताना, शेजारील देशांमध्ये काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. आपल्या शेजारील पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका सारख्या देशात पेट्रोलचे दर जाणून घेतल्यास तुम्हाल आश्चर्याचा धक्का बसेल. चला तर मग या देशांत पेट्रोलसाठी तेथील नागरिकांना भारतीय रुपयांनुसार किती पैसे मोजावे लागतात, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

पाकिस्तानात 55 रुपये लिटर
भारताच्या शेजारील पाकिस्तानचा विचार केल्यास भारताच्या तुलनेत तेथे निम्म्या रकमेत पेट्रोल मिळते आहे. भारतात सध्या पेट्रोलची सरासरी किंमत 103 रुपये लिटर आहे, तर पाकिस्तानमध्ये हाच दर 55.61 रुपये लिटर आहे.

Advertisement

भारताच्या इतर शेजारी देशांमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप कमी आहेत. श्रीलंकेत पेट्रोलची किंमत 68.62 रुपये लिटर आहे. भूतानसारख्या गरीब देशातही पेट्रोल 77 रुपये लिटरने मिळते. तर नेपाळमध्ये पेट्रोल 81.51 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्यामुळे नेपाळच्या सीमावर्ती भागात राहणारे अनेक लोक आपल्या गाडीत तेल भरण्यासाठी नेपाळला जातात.

Advertisement

जगातील अनेक देशांत पेट्रोल खूप स्वस्त आहे. त्यापैकी सर्वात स्वस्त पेट्रोल मिळणाऱ्या 10 देशांबद्दल जाणून घेऊ या. हे दर 4 ऑक्टोबरपर्यंतचे आहेत.

Advertisement

देशनिहाय पेट्रोलचे दर (रुपये/लिटर)
व्हेनेझुएला – 1.49
इराण – 4.46
अंगोला –  17.20
अल्जेरिया – 25.04

Advertisement

कुवैत – 25.97
नायजेरिया – 29.93
कझाकिस्तान – 34.20
इथिओपिया – 34.70
मलेशिया – 36.62

Advertisement
Advertisement

Leave a Reply