नवी दिल्ली : व्हॉट्स ॲप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर (Whatsapp, Instagram, Facebook and facebook messenger) अवघा सोशल मीडियाच सोमवारी (ता. 5) तब्बल सहा तासांसाठी ठप्प झाला होता. त्यामुळे युजर्सना तर काळीजच बंद पडल्यासारखे वाटत होते. मात्र, त्याचा फेसबूकलाही मोठा फटका बसला. कंपनी, त्याचे संस्थापक, शेअर होल्डर आणि या सेवांवर अवलंबून असणाऱ्या अनेकांचे मोठे नुकसान झाले.
एकीकडे सगळा सोशल मीडिया बंद पडलेला असताना, दुसरीकडे त्याचा फायदा टेलिग्राम या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना झाला. व्हॉट्स अॅपच्या नवीन गोपनीयता धोरणामुळे जागतिक स्तरावर संताप निर्माण झाल्यावर टेलिग्रामने जगभरातील युजर्सचा ओघही पाहिला होता.
व्हॉट्स ॲप, इन्स्टाग्राम, फेसबुकची सेवा बंद झाल्याचा फायदा टेलिग्रामला मिळाला. या काळात टेलिग्रामला तब्बल ७ कोटी नवे ग्राहक मिळाल्याची माहिती टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव यांनी दिली. टेलिग्रामवर दररोज येणाऱ्या युझर्सची संख्या वाढली आणि आम्ही तब्ब्ल ७ कोटी नव्या युझर्सचं स्वागत करीत असल्याचे दुरोव म्हणाले.
ते पुढे म्हणाले, की “अनेक युझर्स एकाच वेळी मोठ्या प्रमाणात साईन अप करण्यासाठी आले होते. त्यामुळे अमेरिकेत काही लोकांना कमी स्पीडचा अनुभव आला असेल, परंतु बहुसंख्य युझर्सना नेहमीप्रमाणेच त्याचा अनुभव मिळत होता.”
‘आमच्या टीमने ही अभूतपूर्व वाढ कशी हाताळली, याचा मला अभिमान आहे. कारण टेलीग्राम आमच्या बहुसंख्य युजर्ससाठी सातत्याने काम करीत असल्याचे ते म्हणाले.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप या तिन्हीवर फेसबुकचं स्वामित्व आहे. यामुळे या तिन्हीचे सर्व्हर एकमेकांशी जोडलेले आहेत. भारतीय वेळेनुसार ते ३ वाजून २४ मिनिटांनी फेसबूकची सेवा पुन्हा सुरू झाली. तर व्हाॅटस् अॅप तब्बल ७ तासांनंतर (पहाटे ४ वाजून १९ मिनिटांनी) सुरू झालं.
फेसबूक बंद पडण्यामागील कारण समोर
फेसबूकचे DNS म्हणजेच Domain Name System फेल झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिन्ही सेवा ज्यावेळी बंद झाल्या, त्यावेळी फेसबूकच्या कर्मचाऱ्यांनाही समस्यांचा सामना करावा लागला. त्यांच्या कार्यालयाची मेल सिस्टम आणि कर्मचाऱ्यांच्या ॲक्सेस कार्डनंही काम करणं बंद केलं होतं. याबाबत फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माईक स्करोपफेरनं लोकांची माफीही मागितली आहे.
नगर जिल्ह्यात तीन घटनांमध्ये सहा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू, हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनांबाबत वाचा..
अर्र.. डॉलरमुळे बिघडलेय सोन्याचे गणित; आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे मीटर डाऊन; जाणून घ्या, काय आहेत नवीन दर