Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कपाशीच्या नव्या जातीचा शोध, त्याचा उपयोग पाहून तोंडात बोटे घालाल.. वाचा तर खरं..

नवी दिल्ली : कोरडवाहू क्षेत्रात कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणारे पीक म्हणजे कपाशी.. अर्थात शेतकऱ्यांचं पांढरे सोनं.. जास्तीत जास्त उत्पादन मिळून, शेतकरी सूजलाम-सुफलाम व्हावा, यासाठी पिकांच्या नवनव्या जाती शोधण्याचे काम सुरु असते. संशोधक मंडळी त्यासाठी सतत काही तरी नवे शोधण्याच्या कामात व्यस्त असतात.

Advertisement

कपाशीच्या अशाच एका नव्या जातीचा शोध लावण्यात आला आहे. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या गुवाहाटी शाखेने हा शोध लावला आहे. येथील संशोधकांनी एक वेगळ्याच प्रकारची कापसाची जाती शोधली आहे. सर्वसाधारणपणे कापूस मोठ्या प्रमाणात झटकन पाण्याचे शोषण करुन घेत असतो. मात्र, कपाशीची ही नवी जात पाण्याचे नव्हे, तर तेलाचे शोषण करणार आहे.

Advertisement

समुद्रात वा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तेलगळती होत असते. त्यातून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. पाण्यातील जीवजंतूच्या जिवावर हे तेल उठते. पाण्यात मिसळलेले तेल बाजूला करणे अतिशय कष्टाचे काम असते, पण आयआयटी, गुवाहाटी येथील संशोधकांनी फक्त तेलच शोषणाऱ्या कापसाची नवीन जाती शोधून काढली आहे. त्यामुळे पाण्यात मिसळलेले तेल बाजूला करणे सहज शक्य होणार आहे.

Advertisement

पाण्यापासून तेल वेगळे करता येणार

Loading...
Advertisement

नवी जात विकसित करणे, अतिशय स्वस्त असून ते रिसायकल करता येते. अतिशय पातळ किंवा जाडसर तेल शोधण्याचे कामही हा कापूस करू शकतो. चुकीच्या कालावधीत जर चुकून तेलगळती झालीच, तर या कापसाचा वापर करून पाण्यापासून तेल वेगळे करता येणार आहे.

Advertisement

आयआयटी, गुवाहाटीचे प्रा. श्याम विश्वास यांनी सांगितले, की भारतासारख्या मोठ्या देशांमध्ये नेहमीच समुद्रामार्गे तेलाची वाहतूक केली जाते. काेणत्या ना कोणत्या कारणांनी समुद्रात तेलगळती होण्याचे प्रमाणही नेहमीच जास्त असते. त्याचा मोठा फटका समुद्रातील जीवांना बसतो. पक्षांना या तेलाचा त्रास झाल्यास, त्यांना उडता येत नाही.

Advertisement

शिवाय मासे आणि इतर जिवांनाही या तेलाचा त्रास होतो. समुद्राच्या किंवा नदीच्या पाण्यात विरघळलेले तेल सहसा व्यवस्थितपणे बाजूला करणे शक्य नसते. पण आता या कापसाचा वापर करून ही प्रक्रिया करणे एक शक्य होणार आहे.

Advertisement

मोदी सरकारचा पुन्हा सामान्यांच्या खिशात हात.. जून्या वाहनांच्या नोंदणीसाठी घेतला मोठा निर्णय..
.. तर त्या; 10 लाख मुलांची होईल उपासमार; पहा, कुणी दिलाय हा गंभीर इशारा

Advertisement
Advertisement

Leave a Reply