Take a fresh look at your lifestyle.

सासऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणाऱ्या जावयांना धक्का, कोर्टाने काय आदेश दिलाय वाचा..

एखाद्या कुटुंबात एक किंवा अनेक मुलीच असतील, तर सासऱ्याच्या संपत्तीवर आपलाच हक्क असल्याचे जावई गृहीत धरतात; मात्र अशा लोभी जावयांना धडा शिकवणारा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

Advertisement

सासऱ्याच्या संपत्तीवर हक्क सांगणाऱ्या जावयांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सासऱ्याच्या कोणत्याही मालमत्तेवर जावयाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. सासरच्या मालमत्तेवर आणि घरावरही जावई हक्क सांगू शकत नाही, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना दिला आहे.

Advertisement

नेमकं प्रकरण काय..?
केरळमधील हेंड्री थॉमस यांना फादर जेम्स नाझरेथ आणि सेंट पॉल चर्चकडून भेट म्हणून काही जागा मिळाली होती. त्यावर त्यांनी स्वतःच्या पैशांनी पक्कं घर बांधलं. आपल्या कुटुंबासह ते तेथे राहतात. त्यांना एकुलती एक मुलगी. तिचे लग्न डेव्हिस नावाच्या व्यक्तीसोबत झालं. काही दिवसांनी जावई डेव्हिस याने हेंड्री थॉमस यांच्या मालमत्तेवर आपलाही हक्क असल्याचा दावा केला.

Advertisement

चर्चच्या अधिकाऱ्यांनी दानपत्राद्वारे ही मालमत्ता हेंड्री यांच्या कुटुंबाला दिली. आपण हेंड्री यांच्या एकुलत्या एका मुलीशी लग्न केलं. लग्नानंतर या कुटुंबाने एकप्रकारे आपल्याला दत्तकच घेतलं. त्यामुळे त्यांच्या घरावर, मालमत्तेवर आपलाही अधिकार असल्याचा दावा डेव्हिस याने केला.

Advertisement

तर आपल्याला ही जागा फादर जेम्स नाझरेथ आणि सेंट पॉल चर्चकडून भेट म्हणून मिळाली असली, तरी त्यावर स्वतःच्या पैशांनी घर बांधलंय. त्यावर जावयाचा काहीही अधिकार नसल्याचे हेंड्री थॉमस यांचं म्हणणं होतं. अखेर दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार नसल्याचा निर्णय कोर्टाने दिला.

Advertisement

केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. अनिल कुमार यांनी केरळमधील कन्नूर इथल्या तैलीपरंबा इथले रहिवासी डेव्हिस राफेल यांची याचिका फेटाळून लावली. जावयानं अशा प्रकारचा दावा करणं, लाजिरवाणं असल्याची टिप्पणीही उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात केली. हेंड्री यांनी कोर्टाला विनंती केली की आपला जावई आपल्या मालमत्तेवर अतिक्रमण करत असून, त्याच्यावर कारवाई करावी आणि आपल्याला आपल्या घरात शांतपणे जगू द्यावे.

Advertisement

सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदीही गडगडली, लेटेस्ट किंमती जाणून घेण्यासाठी वाचा..
दिवसा-ढवळ्या लूट..! पेट्रोलपंपावर कसा घातला जातो ग्राहकांना गंडा, गाडीमालकाने काय काळजी घ्यायला हवी, वाचा

Advertisement
Advertisement

Leave a Reply