Take a fresh look at your lifestyle.

दिवसा-ढवळ्या लूट..! पेट्रोलपंपावर कसा घातला जातो ग्राहकांना गंडा, गाडीमालकाने काय काळजी घ्यायला हवी, वाचा

मुंबई – सध्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात पेट्रोलच्या नावावर गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. पेट्रोलपंपावर तर अनेकदा फसवणुकीचे (Petrol Pump) प्रकार समोर आले आहेत. बऱ्याचदा आपण सांगतो, तेवढ्या रकमेचे पेट्रोल गाडीत टाकले जात नाही. दिवसा-ढवळ्या ग्राहकाच्या खिशावर दरोडे घातले जात असताना, त्याची साधी चाहुलही ग्राहकांना नसते.

Advertisement

पेट्रोलपंपावर गेल्यावर नेहमी काही गोष्टींबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला चुना लागलाच म्हणून समजा.. ग्राहक सतर्क राहिल्यास अशा प्रकारे होणारी फसवणूक टाळता येऊ शकते. पेट्रोल पंपावर नेमक्या कशा पद्धतीने गंडा घातला जातो आणि त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत थोडक्यात जाणून घेऊ या..

Advertisement

पेट्रोलपंपावर काय काळजी घ्याल…?

Advertisement

पेट्रोलची शुद्धता तपासा
पेट्राेलपंपावर अनेकदा भेसळयुक्त पेट्रोल विकण्यात येत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कधी तरी पेट्रोलची शुद्धता तपासण्याची आवश्यकता आहे. अगदी साध्या पद्धतीने तुम्ही पेट्रोलची शुद्धता तपासू शकता. त्यासाठी पेट्रोलचे काही थेंब एका कागदावर घ्या. पेट्रोल शुद्ध असेल, तर कोणताही डाग न राहता ते उडून जाते.

Advertisement

भेसळयुक्त पेट्रोलचे डाग कागदावर राहतात. कंज्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्ट 1986 अंतर्गत सर्व पेट्रोलपंपावर फिल्टर पेपर टेस्टची सुविधा असणं अनिवार्य आहे. त्यामुळे पेट्रोलची शुद्धता सहजपणे तपासता येते.

Advertisement

मीटरवर लक्ष ठेवा
गाडीत कधीही पेट्रोल भरण्यापूर्वी पेट्रोलपंपावरील मीटरवर लक्ष देणं गरजेचे आहे. पेट्रोल भरण्याआधी सर्वात आधी मशीनवरील झिरो तपासा. त्यानंतर संपूर्ण पेट्रोल भरेपर्यंत मीटरवर नजर ठेवा.

Advertisement

शॉर्ट फ्यूलिंगद्वारे फसवणूक
पेट्रोलपंपावर अनेकदा ग्राहकांची शॉर्ट फ्यूलिंगमध्ये (Short Fueling) फसवणूक होत असते. उदा. एखाद्याने 2000 रुपयांचे पेट्रोल-डिझेल गाडीत भरले, तर पंपावरील कर्मचारी आधी 1500 रुपयांचे इधन भरुन थांबतो. आपण पुन्हा सांगितल्यावर परत तेथूनच इंधन भरण्यास सुरुवात करतो. अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. याला शॉर्ट फ्यूलिंग म्हटलं जातं.

Advertisement

म्हणून हे लहान राज्यही भाजपला देतेय मोठे टेन्शन; पहा असे फिरलेय फोडाफोडीचे राजकारण
आय्योव.. आलाय नवा विषाणूही; 7 जणांना लगाण, चीननंतर जपानचीही वाढली डोकेदुखी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply