Take a fresh look at your lifestyle.

बाप रे.. व्हाॅटस् अॅप, फेसबूक सात तास ठप्प, मार्क झुकरबर्गला बसलाय पाहा किती मोठा दणका..?

नवी दिल्ली : जगभरातील फेसबुक, व्हाॅट्स अॅप,  इन्स्टाग्राम काल (ता. 4) तब्बल 7 तासांसाठी ठप्प झालं होतं. त्यामुळे अनेक युजर्स गोंधळात पडले. व्हाॅट्स अॅप आणि इन्स्टाग्रामवर फेसबुकचं स्वामित्व आहे. फेसबुकचे सर्व्हर तब्बल सात तास डाऊन झाले होते. आता त्यामागील नेमकं कारण समोर आलंय.

Advertisement

फेसबुकचे DNS अर्थात ‘डोमेन नेम सिस्टीम’ फेल झाल्याने व्हाॅट्स अॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फटका फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना बसलाय. भांडवली बाजारात फेसबुकच्या समभागांची किंमत झपाट्याने कोसळली. जवळपास 4.8 टक्क्यांनी फेसबुकचा समभाग खाली आले होते. त्यामुळे मार्क झुकरबर्गला तब्बल 8.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती ‘फोर्ब्स’कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advertisement

जागतिक श्रीमंतांच्या यादीतून मार्क झुकरबर्ग एका क्रमांकाने खाली घसरला. सप्टेंबरच्या मध्यापासून फेसबुकच्या शेअर्सची किंमत 15 टक्क्यांनी खाली घसरली आहे. सोमवारी (ता. 4) झालेल्या घसरणीमुळे मार्क झुकरबर्गची संपत्ती 12,160 कोटी डॉलर्स झाली. त्यामुळे झुकरबर्ग हा बिल गेटस् यांच्या मागे गेला आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत आता मार्क झुकरबर्ग पाचव्या स्थानावर आहे.

Advertisement

जगभरात व्हाॅटस् अॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक सोमवारी (ता. 4) रात्री साधारण आठ वाजेपासून डाऊन झाले होते. त्यामुळे नेटकऱ्यांना इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर कोणतीही पोस्ट शेअर करता येत नव्हती. व्हाॅटस् अॅपवरुनही संदेश पाठविता येत नव्हते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत अनेक जण सोशल मीडिया कधी पूर्ववत होणार, याची वाट पाहत होते.

Advertisement

अखेर आज (मंगळवारी) पहाटे तांत्रिक बिघाड दूर होऊन हा सोशल मीडिया पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या सेवेत हजर झाला नि जगभरातील नेटकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अनेक कंपन्या आणि संस्थांसाठी त्यांच्या उत्पादनांची जाहिरात आणि प्रसारासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुकचा वापर केला जातो. परंतु, तब्बल सात तास ही दोन्ही माध्यमे ठप्प असल्याने अनेकांना त्याचा फटका बसला.

Advertisement

दरम्यान, फेसबुककडून ट्विटरवर याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेय. “आपल्यावर अवलंबून असलेल्या जगभरातील लोकांसाठी आणि व्यवसायांसाठी आम्हाला खेद वाटतो. आमच्या सर्व सेवा पुन्हा सुरु झाल्या आहेत. आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद..! मार्क झुकरबर्ग यानेही युजर्ससाठी जाहीर दिलगिरी व्यक्त केलीय.

Advertisement

सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदीही गडगडली, लेटेस्ट किंमती जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply