Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील 44 साखर कारखाने लाल यादीत, या नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश, कशामुळे केलीय कारवाई..

मुंबई : शेतकऱ्यांना उसाचा ‘एफआरपी’ वेळेवर न देणे, वजनात फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यावर साखर आयुक्तालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार विविध आरोप असलेल्या या कारखान्यांना लाल यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्यात राज्यातील अनेक आजी-माजी राजकीय पुढाऱ्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे.

Advertisement

राज्य सरकारने साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर कारखान्यांच्या बाबतीत ठोस भूमिका घेतलीय. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 44 कारखान्यांची यादीच साखर आयुक्तालयने जाहीर केली आहे.

Advertisement

लाल यादीत टाकलेले कारखाने
सिद्धेश्वर सहकारी, कुमठे
संत दामाजी, मंगळवेढा
विठ्ठल सहकारी, गुरसाळे, पंढरपूर,
मकाई करमाळा

Advertisement

लोकमंगल अॅग्रो, बीबीदारफळ
लोकमंगल शुगर, भंडारकवठे
सिद्धनाथ शुगर, तिहे, सोलापूर
गोकुळ शुगर धोत्री, सोलापूर

Advertisement

मातोश्री लक्ष्मी, सोलापूर
जयहिंद शुगर, आचेगाव, द .सोलापूर
विठ्ठल रिफाईनड, पांडे, करमाळा
गोकुळ माऊली शुगर तडवळ, अक्कलकोट

Loading...
Advertisement

भीमा सहकारी, टाकळी सिकंदर, मोहोळ
सहकार शिरोमणी, भाळवणी
वैद्यनाथ सहकारी सा. का.

Advertisement

परळी, वैद्यनाथ परळी -पंकजा मुंडे, लोकमंगल- सोलापूर, सुभाष देशमुख यांचे 3 कारखाने एच जे शुगर, रावळगव, जयंत पाटील शेकाप, दामाजी शुगर, समाधान औताडे, हर्षवर्धन पाटील, भालके, विजयसिंह मोहिते पाटील अशा दिग्गज नेत्यांचे कारखानेदेखील लाल यादीत समाविष्ट केले आहेत.

Advertisement

शेतकऱ्यांचा एफआरपी वेळेवर न देणे, वजन करताना शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा ठपका या कारखान्यांवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांनी संबंधित कारखान्यांना ऊस घालताना ही यादी लक्षात ठेवावी, अस आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केलं आहे. शेतकरी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे.

Advertisement

शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला सुरुवात.. आंदोलनाला कोणी कोणी दिलाय पाठिंबा, वाचा..
आंध्र, ओडिसा किनारपट्टीवर ‘गुलाब चक्रीवादळा’चा रुद्रावतार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार, पाहा

Advertisement
Advertisement

Leave a Reply