नवी दिल्ली : मोबाईलधारकांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आहे. मोदी सरकारने नवे सीमकार्ड घेण्याच्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. नागरिकांसाठी सीमकार्ड घेणे सोपे करतानाच, बोगस सीमकार्डचा सुळसुळाट थांबविण्यासाठी दूरसंचार विभागाने काही नियम अधिक कडक केले आहेत.
नव्या नियमांनुसार, नवे सीमकार्ड घेण्यासाठी आता कुठल्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. प्रत्येक नागरिकाचा डिजिटल केवायसी हाच त्यासाठी गृहित धरला जाणार आहे. प्रत्येक टेलिकॉम कंपनीच्या ऍपवर त्यासाठीचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर ग्राहकांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठी नागरिकांना केवळ 1 रुपया शुल्क भरावे लागणार आहे. वेबसाईटवरून वा मोबाईल अॅपवरून ग्राहक हे काम पूर्ण करू शकतात.
तसेच एखादा नंबर प्रीपेड ऐवजी पोस्टपेड करायचा असेल किंवा पोस्टपेडवरून प्रिपेड करायचा असेल, तरी कागदी फॉर्म भरण्याची गरज नाही. डिजिटल फॉर्म भरून ग्राहक हे काम जलद करू शकतील. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी टेलिकॉम विभागाने केवायसीच्या नियमांमध्येही काही बदल केले होते.
डिजिटल केवायसी कशी करणार..?
– सीम प्रोव्हरचे ऍप डाऊनलोड करा.
– स्वतःचा वापरात असणारा किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचा नंबर द्या.
– त्यावर ओटीपी पाठवला जाईल.
– त्यानंतर सेल्फ केवायसीचा पर्याय निवडा. इतर माहिती भरून डिजिटल फॉर्म सबमिट करा.
अल्पवयीन मुलांना सीमकार्ड मिळणार नाही
नव्या नियमानुसार, वयाची 18 वर्षे पूर्ण नसल्यास सीमकार्ड देण्यात येणार नाही. एखाद्याची मानसिक स्थिती ठिक नसल्यास अशा व्यक्तीलाही सीम कार्ड दिले जाणार नसल्याचा नियम करण्यात आला आहे. अल्पवयीन व्यक्तीला किंवा मनोरुग्णाला सीमकार्ड विकल्याचे आढळून आल्यास संबंधित कंपनीला दोषी धरुन कारवाई करण्यात येईल.
नव्या नियमानुसार कुठलीही व्यक्ती स्वतःच्या नावे जास्तीत जास्त 12 सीमकार्ड खरेदी करू शकते. त्यात 9 सिम कार्डचा वापर कॉलिंगसाठी केला जाऊ शकतो, तर 9 सिमचा वापर मशीन-टू-मशीन कम्युनिकेशनसाठी करता येणार आहे.
नागरिकांना घरबसल्या सीमकार्ड
दूरसंचार विभागाने सिम कार्ड घेण्यासाठी eKYC आणि Self KYC प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार नागरिकांना घरबसल्या नवे मोबाईल कनेक्शन मिळणार आहे. सोबत सिम कार्ड पोर्ट करण्याची प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे.
सोने-चांदीचे मार्केट डाऊन; दर कमी होण्याचा ट्रेंड आजही कायम; पहा, आज काय आहेत नवीन भाव
तालिबानने पाकिस्तानला धमकावले..! त्या मुद्द्यावर पाकिस्तानला दिलाय गंभीर इशारा; पहा, कशामुळे होतोय वाद