Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ऑनलाईन पेमेंटची पद्धत बदलणार, आरबीआयने काय निर्देश दिलेत, वाचा..

नवी दिल्ली : ऑनलाईन व्यवहार करताना शॉपिंग पोर्टलकडे कार्डधारकाचे डिटेल्स सेव्ह केले जातात. त्यातून युजरचा डेटा लीक हाेऊन अनेकदा मोठा फ्रॉड झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी ‘आरबीआय’ने 1 जानेवारी 2022 पासून काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

आरबीआयने ऑनलाइन पेमेंटशी संबंधित टोकनायझेशनचे (Tokenisation) नियम जारी केले आहेत. त्यामध्ये कार्डधारकाच्या डेटाच्या गोपनीयतेवर विशेष तरतूद करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2022 पासून हे नियम अंमलात येण्याचे संकेत आहेत.

Advertisement

तुमच्या डेबिट – क्रेडिट कार्डची माहिती अन्य कोणाकडेही (व्यापारी, आॅनलाईन मर्चंट, पेमेंट गेटवे किंवा पेमेंट अॅग्रीगेटर कंपन्या) साठवून न ठेवता, हे व्यवहार करता येतील. म्हणजेच आता पेमेंटसाठी टोकन प्रणाली लागू केली जाईल. वास्तविक, आरबीआयने डेटा स्टोअरेजशी संबंधित टोकनसाठी नियम जारी केले आहेत.

Advertisement

टोकनायझेशन म्हणजे काय..?
कार्ड पेमेंटची टोकनायझेशन ही एक नवीन पद्धत आहे. या पद्धतीने व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत. टोकन म्हणजे प्रत्येक ग्राहकाच्या कार्डचा क्रमांक किंवा माहितीसाठी असलेला पर्यायी संकेतांक. या निर्णयामुळे डिजिटल पेमेंट इकोसिस्टिममध्ये (Digital Payment Ecosystem) खूप मोठे बदल होणार आहेत. आरबीआयच्या या निर्णयाची अंमलबजावणी मागील वर्षीच होणार होती, मात्र व्यापारी व कंपन्यांच्या मागणीनुसार त्याला मुदतवाढ देण्यात आली.

Loading...
Advertisement

टोकन पद्धती कशी असेल..?
व्हिजा, मास्टरकार्ड, रुपे कार्ड सारख्या सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांचा कार्ड नंबर, सीवीवी व इतर डिटेल्सच्या जागी 16 अंकी नंबर जारी करतील. तो ग्राहकांच्या कार्डशी लिंक असेल. ऑनलाईन पेमेंट करताना कार्ड डिटेल्स देण्याऐवजी 16 अंकी नंबरचे डिटेल्स द्यावे लागतील. त्याद्वारे पेमेंट होईल. केवळ बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या कंपनीकडेच युजरचे कार्ड डिटेल्स असणार.

Advertisement

डिसेंबर 2021 नंतर RBI च्या टोकनायझेशन, पेमेंट एग्रीगेटर, व्यापाऱ्यांना ग्राहक कार्ड डेटा गोळा करण्याची परवानगी नाही. त्याचप्रमाणे टोकन प्रणाली अंतर्गत प्रत्येक व्यवहारासाठी कार्ड तपशील इनपुट करण्याची आवश्यकता राहणार नाही. टोकन व्यवस्था ग्राहकांच्या इच्छेवर अवलंबून असेल, ते घेण्यासाठी त्यांच्यावर कोणताही दबाव आणता येणार नाही. या व्यतिरिक्त, कोणत्याही बँक किंवा कार्ड जारी करणाऱ्या कंपन्यांकडून याची सक्ती केली जाणार नाही, असे आरबीआयने जाहीर केलं आहे.

Advertisement

झी एंटरटेनमेंट-सोनी पिक्चर्सचे एकत्रीकरण, भागधारकांवर काय परिणाम होणार..?
Blog | फाॅर्चुनरच्या चक्रव्यूहमध्ये राजाचा बळी; पहा सोयाबीनचे अनर्थचक्र

Advertisement
Advertisement

Leave a Reply