Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. म्हणून मोदींच्या गुजरातेत भाजपची झाली गोची..! पहा नेमका काय खेळ चालूहे गुजरातमध्ये

मुंबई : गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांना नवे मुख्यमंत्री बनवल्यानंतर भाजपमध्ये उडालेली खळबळ अजूनही शमली नाही. नवीन मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ बुधवारी शपथ घेणार होते पण ते पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवली आहे. शपथविधीसाठी लावलेले बॅनर फाडण्यात आले आहेत. मात्र, पक्षाकडून दावा केला जात आहे आणि असे सांगितले जात आहे की शपथ ग्रहण गुरुवारी दुपारी 1.30 वाजता होईल.

Advertisement

भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता त्याचे नवीन मंत्रिमंडळ तयार करायचे आहे. मंत्रिमंडळावर वाद असल्याची पक्षामध्ये आधीच अटकळ होती. असेही म्हटले जात आहे की उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना पदावरून हटवून कुठलेतरी राज्यपाल बनवले जाऊ शकते. परिणामी या राज्यात प्रथमच मागील १५ वर्षात असे चित्र पाहायला मिळाले आहे. गुजरात हे राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य आहे. त्यामुळे येथील गोंधळ ही थेट या दोन्ही नेत्यांना किरकोळ स्वरुपात का होईना दिलेले आव्हान असल्याचे म्हटले जात आहे.

Loading...
Advertisement

गुजरात भाजपचे प्रवक्ते यमल व्यास यांनी सांगितले होते की, नवीन मंत्र्यांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. हे मंत्री राजधानी गांधीनगरमध्ये दुपारी 2 नंतर शपथ घेतील. येथे पोस्टर बॅनर लावण्यात आले होते. शपथविधीची तयारी झाली पण वाद निर्माण झाला. पोस्टर-बॅनर फाडण्यात आले, असे नवभारत टाईम्स यांच्या बातमीत म्हटलेले आहे. विजय रूपांनी  यांनी गेल्या शनिवारी मुख्यमंत्रिपदावरून अचानक राजीनामा दिल्यानंतर केवळ भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी शपथ घेतली. पटेल यांची रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली आणि सोमवारी गांधीनगरमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्याचे 17 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Advertisement

Advertisement

Leave a Reply