Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र सरकारचे ई-व्हेईकल्स धोरण जाहीर, इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर मिळणार घसघशीत सूट..

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. त्यामुळे नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. राज्य व केंद्र सरकारही इलेक्ट्रिक वाहनांसाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना राज्य सरकारची इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसीची (EV Policy) प्रतीक्षा होती. अखेर महाराष्ट्र सरकारने राज्यभरात हे धोरण लागू केले आहे.

Advertisement

महाराष्ट्र सरकारच्या या धोरणांमुळे राज्यात ई-व्हेईकल्स (E-Vehicles) खरेदी करणे आता आणखी स्वस्त होणार आहे. ग्राहकांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. या पॉलिसीची घोषणा झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कधी होते, याची सर्वांनाच प्रतीक्षा लागली होती. मात्र, अखेर ही प्रतीक्षा संपली असून, या पॉलिसीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.

Advertisement


काय आहे पॉलिसी?
महाराष्ट्रातील एखाद्या नागरिकाने ई-व्हेईकल खरेदी केले, तर त्याला नव्या धोरणानुसार भरघोस सवलत मिळणार आहे. त्यासाठी ई-व्हेईकल्सवर सरकारने सबसिडी आणि भरघोस इन्सेन्टिव्ह जाहीर केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यासाठी ग्राहकांना काहीही धावपळ करण्याची गरज नाही. सरकारची सबसिडी मिळवून देण्याची जबाबदारी वाहन उत्पादकांवर सोपविली आहे.

Advertisement

अशी असेल रचना
तुम्ही जर एखाद्या कंपनीची इ-व्हेईकल गाडी खरेदी केली, तर त्या कंपनीला राज्य सरकारकडे सबसिडीसाठी क्लेम करावा लागेल. इनव्हॉईसचे तपशील आणि ऍफिडेव्हिट सबमिट करून आपल्या कंपनीचं वाहन विकलं गेल्याचे पुरावे राज्य सरकारला कंपन्या सादर करतील. दर 15 दिवसांनी कंपन्या सरकारकडे सबसिडी क्लेम करू शकणार आहेत. त्यानंतर या क्लेमची खातरजमा करून 90 दिवसांत कंपन्यांच्या खात्यावर RTGS प्रणालीमार्फत सबसिडीची रक्कम जमा केली जाणार आहे.

Loading...
Advertisement

किती मिळणार सवलत?
राज्य सरकारने पहिल्या 1 लाख ई-व्हेईकल्सवर भरघोस सबसिडीची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2021 पूर्वी वाहन खरेदी केल्यास, या वाढीव सवलतीचा लाभ खरेदीदारांना मिळणार आहे. प्रति किलोवॅट बॅटरीसाठी 5000 रुपयांचं अनुदान मिळणार असल्याची तरतूद या धोरणात करण्यात आली आहे.

Advertisement

3KWh बॅटरीच्या दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांसाठी 15 हजार रुपयांची विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 31 डिसेंबर 2021 ची मुदत सध्या निश्चित करण्यात आली आहे. थोडक्यात 3KWh बॅटरी असणारी दुचारी जर 31 डिसेंबरच्या अगोदर खरेदी केली, तर त्यावर सगळी मिळून 25 हजार रुपयांची सवलत मिळू शकणार आहे.

Advertisement

रामदेव बाबांच्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदार मालामाल..! मोदी सरकारच्या या निर्णयाने झाला मोठा फायदा..

Advertisement

कारखान्यांची धुराडी १५ ऑक्टोबरपासून पेटणार, राज्यात किती ऊस उपलब्ध आहे, पाहा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply