Take a fresh look at your lifestyle.

रामदेव बाबांच्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदार मालामाल..! मोदी सरकारच्या या निर्णयाने झाला मोठा फायदा..

नवी दिल्ली : खाद्यतेलांच्या चढ्या किंमतीमुळे महागाईत भर पडली होती. इंधन दरवाढीमुळे आधीच हैराण झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचा खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोदी सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले. त्यात सीपीओ, पामोलिन, सूर्यफूल, सोयाबीन डिगम आणि सोयाबीन परिष्कृत खाद्यतेलांवरील आयात शुल्क 5.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेय.

Advertisement

पाम तेलावरील आयात शुल्क कमी होताच, बाबा रामदेव यांच्या रुची सोया (Ruchiqa Soya) च्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. पतंजली (Patanjali) ने विकत घेतलेल्या रुची सोयाचा शेअर बीएसईवर ३ टक्क्यांहून अधिक वाढला. बाबा रामदेव यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली. रुची सोयाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. त्यांच्या संपत्तीत 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

Advertisement

भारतातील खाद्यतेलाच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक रुची सोया आहे. पाम तेलावरील आयात शुल्क कमी झाल्याने सोमवारी (ता. १३) रुची सोयाचा समभाग 3.58 टक्क्यांनी वाढून 1081.90 रुपयांवर आला. शेअर बाजारातील घसरणीच्या दरम्यान गुंतवणूकदारांनी रुची सोयामध्ये मोठा नफा कमावला.

Advertisement

रुची सोयाच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 1,000 कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. शुक्रवारी बीएसईवर हा शेअर 1044.50 रुपयांवर बंद झाला. या किंमतीवर कंपनीचे मार्केट कॅप 30,900.59 कोटी रुपये होते. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 1,106.41 कोटी रुपयांची वाढ होऊन ती 32,007 कोटी रुपये झाली.

Advertisement

पाम तेलाबाबत स्वावलंबी होण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या महिन्यात राष्ट्रीय खाद्यतेल-पाम तेल मिशन (NMEO-OP) मंजूर केले होते. या मोहिमेला मंजुरी मिळाल्यानंतर बाबा रामदेव यांनी आसाम, त्रिपुरा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाम तेलाची लागवड सुरू करण्याची योजना आखली आहे.

Advertisement

रुची सोयाच्या एफपीओला सेबीने मंजुरी दिली असून, त्या माध्यमातून 4,300 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. दिवाळखोर रुची सोया कंपनी 2019 मध्ये पतंजली आयुर्वेदने 4,350 कोटी रुपयांना खरेदी केली होती. अदानी ग्रुपही ही कंपनी खरेदीच्या शर्यतीत होता; पण नंतर त्यांनी माघार घेतली.

Advertisement

अलीकडेच एका मुलाखतीत बाबा रामदेव म्हणाले की, पतंजलीचा आयपीओ पुढील वर्षी येऊ शकतो. ते म्हणाले, रुची सोयाआधी आम्ही पतंजलीचा आयपीओ सुरू करण्याचा विचार केला नव्हता. पण आता भीती दूर झाली आहे आणि पुढच्या वर्षी ती बाजारात सूचीबद्ध होईल.

Advertisement

दरम्यान, सरकारने पूर्वीही आयात शुल्क कमी केले होते, पण तरीही खाद्यतेलाच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आल्या नव्हत्या. आयात शुल्कात करण्यात आलेली ही कपात केवळ सप्टेंबरअखेरपर्यंत आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या किंमती तात्पुरत्या स्वरुपातच कमी होऊ शकतात, असे बोलले जाते.

Advertisement

खाद्यतेल स्वस्त होणार; मोदी सरकारने पुन्हा घेतलाय ‘हा’ महत्वाचा निर्णय; पहा, कसा होईल फायदा
कारखान्यांची धुराडी १५ ऑक्टोबरपासून पेटणार, राज्यात किती ऊस उपलब्ध आहे, पाहा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply