Take a fresh look at your lifestyle.

कच्च्या तेलाच्या भावात वाढ..! पेट्रोल-डिझेलच्या दरावर त्याचा काय परिणाम झालाय, वाचा..!

मुंबई : इंधन दरवाढीमुळे देशभरातील नागरिक मेटाकुटीला आलेत. दुसरीकडे केंद्र सरकारच्या सुगीचे दिवस सुरु आहेत. कारण पेट्रोल – डिझेलवरील करांतून केंद्र सरकारच्या महसूलात घसघशीत वाढ झालीय. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांतच इंधनावरील अबकारी करातून (Excise Duty) मिळणाऱ्या महसूलात मोदी सरकारच्या तिजोरीत तब्बल 48 टक्के वाढ झाली.

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी मध्यंतरीच्या काळात सार्वकालिक उच्चांक गाठला होता. इंधन दरवाढ आणि महागाईच्या कात्रीत सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. मात्र, त्यानंतर काही दिवसांपासून इंधन दरवाढ झालेली नाही. अशातच आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी (ता. 9) खनिज तेलाच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढवणार का, अशी शंका उपस्थित होत होती. मात्र, पेट्रोलियम कंपन्यांनी आज (शुक्रवारी) पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. देशात सलग पाचव्या दिवशी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर कायम असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता जाहीर केल्या जातात. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

Advertisement

दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत पेट्रोलचा दर 107.26 रुपये लिटर, तर डिझेलचा भाव 96.19 रुपये लिटर होता. दिल्लीत पेट्रोल व डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये आहे.

Advertisement

दरम्यान, सामान्य नागरिकही ‘एसएमएस’च्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. त्यासाठी इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागेल. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

Advertisement

केंद्र सरकारला तेल रोख्यांचे पैसे अदा करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांत कराच्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न या देयकांच्या तीनपट इतके आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै या काळात अबकारी कराच्या माध्यमातून सरकारला एक लाख कोटीहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी हाच आकडा 67,895 कोटी रुपये इतका होता.

Advertisement

करदात्यांना दिलासा.. आयटीआर भरण्यासाठी मोदी सरकारकडून मुदतवाढ, कसा होणार फायदा..?
त्या नेत्यांच्या मुर्खपणामुळेच मोदी पंतप्रधान..ओवेसींची जहरी टिका..वाचा काय आहे कारण..

Advertisement
Advertisement

Leave a Reply