Take a fresh look at your lifestyle.

खळबळजनक..! केडगावातील एकाच कुटुंबातील तिघांची गळफास घेऊन आत्महत्या, पोलिस घटनास्थळी दाखल..

अहमदनगर : कर्जबाजारीपणाला कंटाळून केडगाव उपनगरातील एकाच कुटुंबातील तिघांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे केडगाव परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Advertisement

संदीप दिनकर फाटक (वय 40), त्यांची पत्नी किरण संदीप फाटक (वय 32) व मुलगी मैथिली संदीप फाटक (वय 10) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोटही आढळून आली आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शहरातील जिल्हा रुग्णालयात हलविले होते.

Advertisement

केडगावातील मोहिनीनगरमधील विठ्ठल कॉलनीत फाटक कुटुंब राहत होते. गळफास घेतलेल्या अवस्थेत आज सकाळी त्यांचे मृतदेह शेजाऱ्यांना आढळून आले. याबाबत तातडीने पोलिसांना कळविण्यात आले.

Advertisement

कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक राकेश माणगावकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाल्याचे समजते. कर्जाला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

मृतामध्ये मुलगी मैथली ही केवळ 10 वर्षांची आहे. तिनेही आत्महत्या केलीय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, एका हसत्या- खेळत्या कुटुंबाने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने नगर शहरात हळहळ व्यक्त होत होती.

Advertisement

इन्कम रिटर्न भरण्यापासून ज्येष्ठ नागरिकांना सूट, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..
एफडीबाबत रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय, गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply