नाशिक : गेल्या काही दिवसांपासून काकडी, शिमला पाठोपाठ टोमॅटोला मातीमोल भाव मिळत आहेत. बाजारात न्यायलाही हा माल परवडत असल्याने शेतकऱ्यांनी त्यावर ट्रॅक्टर फिरवण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी बाजारात माल नेला खरा, मात्र भाव कोसळल्याचे पाहून टोमॅटोने भरलेल्या जाळ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात फेकून देत संताप व्यक्त केला.
टोमॅटाेनंतर आता स्थिर असलेल्या कांद्याच्या भावातही मोठी घसरण झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक कोंडीत सापडलाय. उन्हाळी कांद्याची २० ऑगस्ट रोजी सरासरी १७४० रुपये प्रति क्विंटलने विक्री झाली होती. मात्र, मागील आठच दिवसांत त्यात प्रति क्विंटलमागे २६० रुपयांची घसरण झाल्याचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळाले.
यंदा आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे तेथून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला असणारी मागणी कमी झाली आहे. दुसरीकडे देशातून कांदानिर्यात सुरू असली, तरी आपल्या तुलनेने पाकिस्तान, अफगाणिस्तानचा कांदा स्वस्त आहे. त्याचाही फटका भारतीय कांद्याला बसला आहे.
देशात मुबलक कांदा उपलब्ध असल्याने भावात मोठी घसरण होत आहे. कांद्यासह टोमॅटो, भाजीपाला अगदी कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या आशेवर कांदा चाळीत साठवून ठेवला होता आहे.
दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे चाळीतील हा कांदाही खराब होण्यास सुरुवात झाली आहे. त्यात सध्या मिळणारा दर आणि झालेला खर्च निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. केंद्र सरकारने कांद्याच्या दरात होणारी घसरण थांबविण्यासाठी निर्यात प्रोत्साहन योजना राबविणे गरजेचे असल्याचे व्यापारी वर्गाकडून बोलले जात आहे.
आधी पैसा, मग वीज..! आता वीज मीटरचाही मोबाईलप्रमाणे रिचार्ज करावा लागणार, मोदी सरकारची नवी योजना..
फ्लिपकार्ट देतेय 2 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज..! तुमचा कसा होणार फायदा पाहा..?