मुंबई : भारतातील किराणा आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी व्यवसाय सुलभ करण्यासाठी, व्यवसाय वाढीसाठी फ्लिपकार्ट होलसेलने (Flipkart Wholesale) नवीन क्रेडिट स्किम सुरू केली आहे. या योजनेनुसार, व्यापाऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.
किराणा दुकानदार, किरकोळ विक्रेत्यांना त्यांच्या कामाच्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्याशिवाय त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी ही योजना मदत करील. फ्लिपकार्ट होलसेल ही वॉलमार्टची मालकी कंपनी फ्लिपकार्टची डिजिटल बी 2 बी (बिझनेस टू बिझनेस) बाजारपेठ आहे.
देशातील किराणा व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी फ्लिपकार्टने ही योजना सुरु केली आहे. फ्लिपकार्ट होलसेलची ही क्रेडिट योजना आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या (IDFC FIRST Bank) भागीदारीत किराणा दुकानदारांना मिळणार आहे. त्यात ‘ईझी क्रेडिट’चाही समावेश आहे.
आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इतर फिनटेक संस्थांच्या भागीदारीत एंड-टू-एंड डिजिटल ऑन बोर्डिंगद्वारे शून्य किंमतीत कर्ज घेता येणार आहे. त्यात 5,000 ते 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज असेल. त्यासाठी 14 दिवस कोणतेही व्याज आकारले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.
भारतातील किराणा दुकानांचा देशाच्या किरकोळ विभागातील वाटा दोन तृतीयांशपेक्षा जास्त आहे. हा पारंपारिक व्यापार आता किरकोळ स्वरूप आणि व्यवसाय मॉडेल म्हणून विकसित होत आहे. फ्लिपकार्ट होलसेलचे देशभरात 15 लाखांहून अधिक सदस्य आहेत. त्यात किराणा दुकानदार, किरकोळ विक्रेते, हॉटेल्स, रेस्टोरंट्स, कॅफेटेरियासह कार्यालये आणि संस्थांचाही समावेश असल्याची माहिती देण्यात आली.
चेकबाबत रिझर्व्ह बॅंकेचे नवे नियम पाहिले का..? नाहीतर बसू शकतो मोठा फटका..
एमआयडीसीच्या भूखंडावरील बांधकामाबाबत लवकरच मोठा निर्णय, उद्योगमंत्र्यांनी पाहा काय म्हटलंय..?