Take a fresh look at your lifestyle.

तालिबानी नेत्यांवर फेसबूकची मोठी कारवाई..! मोठा निर्णय घेतला.. त्याचा काय होणार परिणाम..?

नवी दिल्ली : अमेरिकी सैन्याची पाठ फिरत नाही, तोच कट्टर दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. संपूर्ण अफगाणिस्तान या दहशतवादी संघटनेच्या अंमलाखाली आला आहे.

Advertisement

अफगाणी नागरिक मिळेल त्या मार्गाने आपली मातृभूमी सोडून जात आहेत. यानिमित्ताने एक भयावह चित्र जगासमोर आले आहे. त्याचे पडसाद सोशल मीडियातूनही उमटत असल्याचे दिसून येत आहेत.

Advertisement

अमेरिकेने तालिबानला दहशतवादी संघटना असल्याचे म्हटलेले आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबूकने तालिबानी संघटनेविरुद्ध मोठी कारवाई सुरु केली आहे. फेसबूकच्या सेवांपासून तालिबानच्या नेत्यांना वंचित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय तालिबानची सर्व अकाऊंट हटवली जाणार आहेत. तालिबानच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या सर्व अकाऊंटवर बंदी घातली जाईल, अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्याने दिली.

Advertisement

तालिबान्यांनी अफगाणिस्तानची सत्ता काबिज केल्यानंतर तालिबानला प्रोत्साहन देणारी सर्व माहिती फेसबूक आता काढून टाकत आहे. तालिबानला प्रोत्साहन देणारी सामग्री त्याच्या प्लॅटफॉर्मवरून सक्रियपणे काढून टाकण्यात येत आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले की, कंपनीकडे ‘दरी’ आणि ‘पश्तो’ भाषा तज्ज्ञांची संपूर्ण टीम आहे, जी आम्हाला स्थानिक माहितीची देखरेख आणि माहिती देत ​​आहे.

Advertisement

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक तालिबानी प्रवक्ते, नेते आहेत. पैकी अनेकांची फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट आहेत. तेथून ते सातत्याने वक्तव्ये करीत आहेत. आता फेसबुकने ही कारवाई केल्यामुळे त्यांचे लक्ष ट्विटरसह इतर प्लॅटफॉर्मवर असणार आहे.

Advertisement

मोदी सरकारने दुचाकीस्वारांसाठी केले नवे नियम, बाईकवर मागे बसण्यापूर्वी हे नियम वाचा, नाहीतर बसेल दंडाचा फटका..
सोन्याला झळाळी, चांदीची चमकही वाढली..! रुपयाची मात्र घसरण, सराफा बाजारातील स्थिती पाहा

Advertisement
Advertisement

Leave a Reply