Take a fresh look at your lifestyle.

पेट्राेल दरवाढीसाठी काॅंग्रेसच जबाबदार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा..

नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून दराचे रोज नवनवे उच्चांक करणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसला. कारण, काल (सोमवारी) सलग 30 व्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल-डिझेलची यापूर्वीची धडकी भरवणारी वेगवान दरवाढ पाहता महिनाभर किंमती स्थिर राहणे, हादेखील एकप्रकारचा विक्रमच म्हणावा लागेल. गेल्या महिनाभरात इंधन स्वस्तही झाले नसले, तरी किंमती स्थिर राहणे हीदेखील आश्वासक बाब मानली जात आहे.

Advertisement

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सध्या तरी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही कपात करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, या दरवाढीसाठी त्यांनी यूपीए सरकारलाच जबाबदार धरले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना चढ्या दराने तेल रोखे (Oil Bonds) जारी केले होते.

Advertisement

आता या रोख्यांचा कालावधी आता पूर्ण झाला असून, पेट्रोलियम कंपन्यांकडून ते वटवले जात आहेत. परिणामी मोदी सरकारला रोख्यांचे पैसे आणि व्याज चुकते करावे लागत आहे. त्यामुळे आम्हाला तुर्तास तरी हे दर (Fuel Price) कमी करता येणार नाही. यूपीए सरकारने ही चूक केली नसती, तर आता पेट्रोल-डिझेलच्या दरात सहज कपात करता आली असती, असे प्रतिपादन निर्मला सीतारामन यांनी केले.

Advertisement

काँग्रेस सरकारने इंधनाच्या किमती कृत्रिमरीत्या कमी ठेवून, या तुटीची भरपाई सरकारी तेल कंपन्यांना रोख्यांची विक्री करून दिली. आता हे रोखे आणि त्यावरील व्याजाची परतफेड मोदी सरकारला करावी लागते आहे. गेल्या पाच वर्षांत तेल रोख्यांवरील व्याजापोटी सरकारने 60 हजार कोटी रुपये चुकते केले आहेत, तरीही 1.30 लाख कोटी रुपयांचे दायित्व अजून बाकी असल्याचे सीतारामन यांनी म्हटले. हे ओझे नसते, तर आमच्या सरकारने इंधन विक्रीवरील अबकारी दर कमी केला असता, असेही सीतारामन यांनी सांगितले.

Advertisement

मोदी सरकारने दुचाकीस्वारांसाठी केले नवे नियम, बाईकवर मागे बसण्यापूर्वी हे नियम वाचा, नाहीतर बसेल दंडाचा फटका..
चहाच्या घोटाने वाजतील आरोग्याचे बारा.. पाहा किती नुकसानकारक आहे चहा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply