Take a fresh look at your lifestyle.

‘फ्लिपकार्ट’वर ईडीची वक्रदृष्टी, नियमभंग केल्याप्रकरणी 10 हजार कोटींच्या दंडाची नोटीस, नेमकं प्रकरण काय आहे..?

नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची वक्रदृष्टी आता देशातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी असणाऱ्या फ्लिपकार्टवर पडली आहे. परदेशी गुंतवणूक कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने फ्लिपकार्ट (Flipkart) व कंपनीच्या संस्थापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात 10,000 कोटी रुपयांचा (1.35 अब्ज डॉलर) दंड का ठोठावू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे फ्लिपकार्ट कंपनीचे धाबे दणाणले आहे.

Advertisement

फ्लिपकार्ट आणि कंपनीचे संस्थापक सदस्य बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांच्याविरुद्ध परदेशी गुंतवणूक कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप ईडीने केला आहे. जुलैमध्ये परकीय चलन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत (फेमा) सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने या संस्थांवर कारवाई केली आहे.

Advertisement

फ्लिपकार्टने विदेशी गुंतवणूक आकर्षित केली आणि संबंधित पक्ष डब्ल्यूएस रिटेल यांनी त्यांच्या शॉपिंग वेबसाइटवर ग्राहकांना सामानाची विक्री केली, जे कायद्यानुसार प्रतिबंधित आहे. ई-कॉमर्स दिग्गज फ्लिपकार्ट आणि अमेझाॅनची (Amazon) सध्या कथित स्वरुपात परकीय गुंतवणुकीच्या कायद्यानुसार चौकशी केली जात आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, हे 2009 ते 2015 दरम्यानचे प्रकरण आहे. जुलैमध्ये ईडीच्या चेन्नई ऑफिसने फ्लिपकार्ट, कंपनीचे फाउंडर्स सचिन आणि बिन्नी बन्सल यांच्यासह सध्याचे गुंतवणूकदार टायगर ग्लोबल यांनी ही कारणे दाखवा नोटीस पाठविली. त्यात कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर 10000 कोटींचा दंड का ठोठावू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Advertisement

दरम्यान, फ्लिपकार्ट कंपनी कायद्याचे, नियमांचे पालन करीत असून, कंपनी अधिकाऱ्यांसह संपूर्ण सहयोग करील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

फ्लिपकार्ट आणि इतर पक्षांना नोटीसीला उत्तर देण्यासाठी 90 दिवसांचा अवधी दिला आहे. WS Retail ने 2015 च्या अखेरपर्यंत त्यांचे कामकाज बंद केले होते. टायगर ग्लोबलने त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ईडीनेही यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला.

Advertisement

वॉलमार्टने 2018 मध्ये 16 अब्ज डॉलरमध्ये फ्लिपकार्टमधील सर्वाधिक भागीदारी खरेदी केली होती. सचिन बन्सल यांनी त्यांची सर्व भागीदारी विकली होती, तर बिन्नी बन्सल यांच्याकडे अद्याप काही हक्क शिल्लक असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

शेअर बाजारात खरेदीचा ओघ कायम, सेन्सेक्स विक्रमी स्तरावर, भांडवली बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..
सोन्याच्या दरात घसरण, चांदीही उतरली..! गुंतवणुकदारांसाठी मोठी संधी, पाहा सराफ बाजारातील स्थिती..

Advertisement
Advertisement

Leave a Reply