बाबा रामदेव सुरु करणार नवा व्यवसाय, शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा, कसा तो तुम्हीच पाहा..?
नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव आता नवा व्यवसाय सुरु करीत असल्याची माहिती आहे. बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहातील (Patanjali) रुची सोया कंपनीने आसाम, त्रिपुरा आणि ईशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये तेलताडाची लागवड करण्याचे ठरविले आहे. शेतकऱ्यांसोबत करार करून ही लागवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
पतंजली समूहाने दोन वर्षांपूर्वी रुची सोया ही कंपनी विकत घेतली. या कंपनीने तेलताडाच्या (Oil Palm) बागांसाठी आसाम, त्रिपुरासह ईशान्येकडच्या अन्य राज्यांमधील शेतजमिनीचे सर्वेक्षण केले होतं. त्यानुसार आता रुची सोया कंपनी प्रक्रिया युनिट्सची स्थापना करणार आहे. शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या बागांमधून उत्पादित झालेला कच्चा माल या प्रक्रिया युनिट्समध्ये खरेदी करण्याची हमी दिली जाणार आहे.
सध्या भारतातील आसाम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, अंदमान, गुजरात, गोवा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातही काही प्रमाणात तेलतालाडाची लागवड होते. ईशान्येकडच्या राज्यांत ही लागवड वाढविण्यासाठी या योजनेद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या बागांमधील ताडापासून रुची सोयाच्या प्रक्रिया युनिट्समध्ये तेलाची निर्मिती केली जाणार आहे.
काढणीनंतर 48 तासांच्या आत त्यापासून तेलाची निर्मिती करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागांपासून जवळच्या अंतराच्या भागांत कंपनीची प्रक्रिया युनिट्स उभारली जाणार आहेत. या लागवडीची सुरुवात नेमकी कधी केली जाणार, याबाबत माहिती दिलेली नाही.
रुची सोया कंपनी सध्या गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. कंपनीच्या फॉलोऑन पब्लिक ऑफरनंतर (FPO) ही लागवड सुरू केली जाऊ शकेल, असा अंदाज आहे.
एके काळी रुची सोया कंपनी कर्जात बुडाली होती. पतंजली आयुर्वेद कंपनीने 2019 मध्ये ही कंपनी 4350 कोटी रुपयांना खरेदी केली. त्यासाठी पतंजली कंपनीला 3200 कोटी रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं होतं. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून 1200 कोटी रुपये, सिंडिकेट बँकेकडून 400 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेकडून 700 कोटी रुपये, युनियन बँक ऑफ इंडियाकडून 600 कोटी रुपये, तर अलाहाबाद बँकेकडून 300 कोटी रुपयांचं कर्ज पतंजली कंपनीने रुची सोयाच्या खरेदीसाठी घेतलं होतं.
आता रुची सोया या कंपनीतली 4300 कोटी रुपयांचे शेअर्स फॉलोऑन पब्लिक ऑफरद्वारे विकले जाणार आहेत. या विक्रीतून मिळालेल्या रकमेतून कर्ज फेडलं जाईल, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे
शेअर बाजारात तेजी परतली..! सेन्सेक्स-निप्टीची घोडदौड सुरु, बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..!
आणि तेही उठले शेतकऱ्यांच्या मुळावर; पहा नेमका काय प्रकार घडलाय आंदोलकांबाबत