Take a fresh look at your lifestyle.

पेट्राल-डिझेलची दरवाढ कमी होणार नाही, मोदी सरकार करकपात करण्यास अनुत्सुक, नागरिकांचा खिसा खाली होणार..!

मुंबई : देशात मागील 17 दिवसांपासून पेट्राेल-डिझेलचे दर स्थिर आहेत. कच्च्या तेलाचे दर काही दिवसांपासून कमी होत आहेत. त्यामुळे मोदी सरकार इंधन दरातही कपात करील, असे वाटत असेल, तर थांबा.. कारण, मोदी सरकार कोणतीही दरकपात करण्याच्या मूडमध्ये सध्या तरी नाही.

Advertisement

पेट्रोल-डिझेलवर लादण्यात येणाऱ्या कराच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत भरभक्कम पैसा येत आहे. सध्याच्या घडीला भारत हा इंधनावर सर्वाधिक कर लावणारा देश ठरला आहे. या आयत्या उत्पन्नावर पाणी सोडण्यास केंद्र सरकार तुर्तास तरी तयार नसल्याचे समजते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल नागरिकांना चढ्याच दराने खरेदी करावे लागणार आहे.

Advertisement

मागील काही दिवसांपासून पेट्राेल-डिझेलच्या दराचे रोजरोज नवनवे विक्रम होत होते. गेल्या पंधरवड्यापासून या दरवाढीला लगाम बसल्याचे चित्र आहे. सलग 17 व्या दिवशी, आजही (मंगळवारी) पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, इंधन दरवाढीला तुर्तास लगाम लागला असला, तरी सामान्य लोकांना अपेक्षित असणारी दरकपात केंद्र सरकार करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

Advertisement

एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवून मोदी सरकारने काहीसा दिलासा दिला असला, तरी इंधनावरील करात कोणत्याही परिस्थितीत कपात होणार नसल्याचाच अप्रत्यक्ष संदेश केंद्राने दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement

प्रमुख शहरांतील इंधन दर (प्रति लिटर)
मुंबई : पेट्रोल- 107.83, डिझेल 97.45
पुणे : पेट्रोल- 107.39, डिझेल 95.71
नाशिक : पेट्रोल- 108.14, डिझेल 95.85
औरंगाबाद : पेट्रोल- 109.12, डिझेल 98.69
कोल्हापूर : पेट्रोल- 107.89, डिझेल 95.97

Advertisement

केंद्र सरकार इंधनावरील अबकारी दरात कपात करेल, अशी चर्चा होती. जेणेकरून पेट्रोल-डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले असते. मात्र, मोदी सरकारचा सध्याचा एकूण नूर पाहता, सरकार सध्या इंधनावरील करात कपात करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे जनतेला आणखी काही दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सहन करावी लागू शकते.

Advertisement

केंद्र सरकारने अबकारी दरात कपात केल्यास पेट्रोल-डिझेल 10 रुपयांनी स्वस्त होईल. मात्र, त्यामुळे महागाई दरात जास्तीत जास्त 0.2 टक्क्यांचीच घट होईल. याउलट सरकारच्या तिजोरीतील महसूल 0.58 टक्क्यांनी कमी होईल. त्यामुळे इंधनाच्या करकपातीचा विशेष फायदा होणार नाही.

Advertisement

परिणामी मोदी सरकार यासाठी फार अनुकूल नाही. तसेच इंधनावरील करकपातीमुळे महसूल कमी होईल. सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात ही गोष्ट केंद्र सरकारसाठी चांगली नाही. त्यामुळे इंधनाच्या दरातील कपात आणखी काही दिवस लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

वोडाफोन-आयडिया गाशा गुंडाळण्याच्या तयारीत..! पाहा कशामुळे आलीय दिग्गज कंपन्यांवर ही वेळ..?
बारावीचा निकाल पाहण्यासाठी राहा तयार; ‘तिथे’ पाहता येणार तत्काळ निकाल..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply