Take a fresh look at your lifestyle.

फेसबूक बंद करणार लहान मुलांचे अकाऊंट..! पाहा कशामुळे घेतलाय हा निर्णय..?

नवी दिल्ली : सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. अगदी लहान-थोर सोशल मीडिया वापरतात. त्यात लहान मुलांचे प्रमाण सतत वाढत आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियावरील अकाउंट तयार करण्यासाठी 13 वर्षे वय असणं आवश्यक आहे; पण अनेक जण खोटी जन्मतारीख टाकून सोशल मीडिया अकाऊंट सुरु करतात.

Advertisement

फेसबूकवर 13 वर्षांखालील मुलांचे मोठ्या प्रमाणात अकाउंट असून, लहान मुले अक्षरश: त्याच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे. ही बाब चिंताजनक असल्याने फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून 13 वर्षांखालील मुलांना दूर ठेवण्यासाठी एक आर्टीफिशीयल इन्टेलिजन्स (Artificial intelligence) डेव्हलप करण्यात येत आहे, ज्याद्वारे युजर 13 वर्षांखालील आहे की नाही, हे समजण्यास मदत होणार आहे.

Advertisement

फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर 13 वर्षाखालील मुलंही करू शकतील, अशा प्रकारे डिझाईन केलेलं नाही. त्यावर बऱ्याचदा लहान मुलांसाठी हानीकारक कंटेंट असतो. त्यामुळे या सोशल मीडियाच्या वापरासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे फेसबूक कंपनी असे गोष्ट शोधत आहे, की जे कमी वयोगटातील मुलांना या प्लॅटफॉर्मवर येण्यापासून रोखेल.

Advertisement

13 वर्षाहून कमी वयोगटातील मुलांना शोधण्यासाठीच कंपनी AI डेव्हलप करीत आहे. एखाद्या युजरकडून नवीन अकाउंट ओपन करतानाच AI त्या युजरच्या वयाचा अंदाज घेईल, जेणेकरुन 13 वर्षाखालील मुलांना ओळखणं शक्य होईल.

Advertisement

अनेक कमी वय असलेले युजर्स चुकीची जन्मतारीख टाकून फेसबुक अकाउंट ओपन करतात. अशा युजर्सला शोधण्यासाठीही कंपनीने काही मार्ग काढले आहेत. तसेच या संवेदनशील प्रकरणांत फेसबुक OS प्रोव्हायडर, इंटरनेट ब्राउजर आणि इतर प्रोव्हायडरसह काम करीत आहे, जेणेकरुन ते आपल्या डेटाद्वारे 13 वर्षाखालील मुलांची ओळख करण्यास मदत करू शकतील.

Advertisement

सोने वधारले, चांदीची चमकही वाढली, सराफ बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..!
आता बोला..! मोदी सरकारच म्हणतेय, होय.. खाद्यतेलाचे भाव वाढलेत..! संसदेत राज्यमंत्र्यांनी काय माहिती दिली, तुम्हीच पाहा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply