Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ऑगस्टमध्ये कमी काम, करा नुसता आराम..! बॅंकांना या महिन्यात सुट्याच सुट्या, पाहा ही यादी..!

नवी दिल्ली : ऑगस्ट महिना बँक कर्मचाऱ्यांसाठी बंपर सुट्ट्या घेऊन आला आहे. जवळपास अर्धा महिना सुट्यातच जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी ‘कमी काम नि नुसता आराम’ करण्याची संधी आहे.

Advertisement

मात्र, तुम्ही बॅंकेचे खातेदार असाल, काही महत्वाची कामे असतील, तर ती पुढे ढकलण्याच्या भानगडीत पडू नका. नाहीतर सुटीच्या कचाट्यात महत्वाचे काम अडकून पडायचे. तुम्ही बॅंकेत जाल नि गेटला टाळे असायचे. ऑगस्टमध्ये कधी सुट्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा..

Advertisement

प्रत्येक राज्यांनुसार रिझर्व्ह बॅंकेतर्फे सुट्ट्या जाहीर करण्यात येतात. त्यानुसार बॅंकांना सुट्या मिळतात. ऑगस्ट-2021 मध्ये एकूण 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यात दर रविवारी आणि महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारचही सुटी आहे. शिवाय प्रत्येक राज्यातील सण, उत्सव, जत्रा आदीमुळे त्या त्या राज्यातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

Advertisement

ऑगस्ट 2021 मधील सुट्यांची यादी
1 ऑगस्ट 2021 : रविवार.
8 ऑगस्ट 2021 : रविवार
13 ऑगस्ट 2021 : Patriots Day मुळे इम्फाल झोनमध्ये बँका बंद.
14 ऑगस्ट 2021 : दुसरा शनिवार.
15 ऑगस्ट 2021 : रविवार आणि स्वातंत्र्यदिन.
16 ऑगस्ट 2021 : पारशी नववर्षामुळे महाराष्ट्रातील बेलापूर, मुंबई आणि नागपूर विभागांतील बँका बंद.

Advertisement

19 ऑगस्ट 2021 : मोहरममुळे आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची आणि श्रीनगर या भागांतील बँका बंद.
20 ऑगस्ट 2021 : मोहरम आणि पहिल्या ओणममुळे बंगळुरू, चेन्नई, कोची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी.

Loading...
Advertisement

21 ऑगस्ट 2021 : थिरुवोणममुळे कोची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी.
22 ऑगस्ट 2021 : रक्षाबंधन आणि रविवार.
23 ऑगस्ट 2021 : श्रीनारायण गुरू जयंतीमुळे कोची आणि केरळ झोनमध्ये बँका बंद.
28 ऑगस्ट 2021 : चौथा शनिवार

Advertisement

29 ऑगस्ट 2021 : रविवार.
30 ऑगस्ट 2021 : जन्माष्टमीची सुटी.
31 ऑगस्ट 2021 : श्रीकृष्ण अष्टमीमुळे हैदराबादमध्ये बँका बंद.

Advertisement

पाच दिवसांचा मिळणार लाँग वीकेंड
ऑगस्टमध्ये कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा ‘लाँग वीकेंड’ 19-23 ऑगस्ट दरम्यान मिळणार आहे. एकत्र आलेल्या सुट्ट्यांमुळे त्या विभागातील कर्मचाऱ्यांना फिरायला जाण्याची उत्तम संधी आहे.

Advertisement

झोमॅटोच्या तेजीला ब्रेक..! शेअर बाजार गडगडला, कोट्यवधीचा फटका..!
‘कमळ’यानासाठी विदर्भा भाजपचे सीमोल्लंघन; मात्र, आरोपात नाव पुढे आल्यावर बावनकुळे म्हणतात असे

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply