‘रिलायन्स’ व ‘फ्युचर ग्रुप’मधील व्यवहारावर ‘अॅमेझॉन’चा आक्षेप, कशामुळे आक्षेप घेतलाय जाणून घेण्यासाठी वाचा..
नवी दिल्ली : ऑक्टोबर 2020 मध्ये रिलायन्स ग्रुपने ‘फ्यूचर’चा (बिग बाजार) किराणा व्यवसाय खरेदी करण्याबाबत करार केला. मात्र, तत्पुर्वीच ‘अॅमेझॉन’ने ऑगस्ट 2019 मध्ये ‘फ्युचर कूपन्स’मधील 9 टक्के हिस्सा खरेदी करुन उर्वरित हिस्सा 10 वर्षांत खरेदी करण्याचे प्रथम हक्क घेतले होते.
‘फ्यूचर’ला दुसऱ्या कोणत्याही कंपनीसोबत करार करण्याआधी ‘अॅमेझॉन’ला माहिती देणे महत्त्वाचं होतं; पण ‘फ्यूचर’ने कोणतीही कल्पना न देता, रिलायन्ससोबत करार केल्याचा आराेप ‘अॅमेझॉन’ने केला आहे. ‘अॅमेझॉन’च्या आक्षेपानंतर ‘फ्यूचर’चा किराणा व्यवसाय खरेदी करण्याबाबत कायदेशीर पूर्तता होऊ शकली नाही.
‘रिलायन्स’ आणि ‘फ्युचर ग्रुप’मधील व्यवहारावर आक्षेप घेणाऱ्या अॅमेझॉन कंपनीने आता न्यायालयाचे दरवाजे ठाेठावण्याचे संकेत दिले आहेत. ‘फ्युचर ग्रूप’ने आमच्याशी यासंदर्भात बोलणी केली होती. सिंगापुरस्थित लवादाच्या आदेशानुसार फ्युचर ग्रुपला कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे. या लवादाने फ्युचर रिटेल लिमिटेड आणि रिलायन्स लिमिटेडमधील विलिनीकरणाला स्थगिती दिली असल्याचे ‘अॅमेझॉन’कडून सांगण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर गुरुवारी (ता.२२) या प्रकरणावर सुनावणी झाली. सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटरने ‘फ्युचर रिटेल लिमिटेड’ आणि रिलायन्स लिमिटेडमधील 24,713 कोटींच्या व्यवहाराला स्थगिती दिल्याचे अॅमेझॉनने सांगितले. आम्ही किशोर बियाणी यांच्या घरातील व्यक्तींशी वाटाघाटी केल्या होत्या. त्यामुळे फ्युचर ग्रूप परस्पर रिलायन्सशी व्यवहार करू शकत नाही, असा दावाही ‘अॅमेझॉन’च्या वकिलांनी केला आहे.
‘फ्युचर ग्रूप’चे वकील हरिश साळवे 27 जुलै रोजी न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत. या संबंधाने सुरू असलेल्या कायदेशीर लढाईतच ‘फ्यूचर समूहा’ने भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यानुसार आयोगाने अॅमेझॉनला नोटीस पाठवली असून त्यावर उत्तर देण्यास सांगितले आहे. फ्यूचर समूहाकडून मात्र नेमक्या आरोपाचे अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
आयकर पोर्टल ऑगस्टपासून सेवेत..! मोदी सरकारची ग्वाही, करदात्यांना कसा फायदा होणार, जाणून घेण्यासाठी वाचा..!
एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी हे नियम पाहा.. नाहीतर बसू शकतो खिशाला फटका..