Take a fresh look at your lifestyle.

आयकर पोर्टल ऑगस्टपासून सेवेत..! मोदी सरकारची ग्वाही, करदात्यांना कसा फायदा होणार, जाणून घेण्यासाठी वाचा..!

मुंबई : आयकर भरण्यासाठी आधुनिक प्रकारची इन्कम टॅक्स फायलिंग यंत्रणा (E-filing System) विकसित करण्यासाठी भारत सरकारने 2019मध्ये इन्फोसिस कंपनीला एक कंत्राट दिले होते. रिटर्न (Income Tax Return) पडताळणीसाठी लागणारा कालावधी 63 दिवसांवरून एका दिवसावर आणणे आणि रिफंडची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

Advertisement

इन्फोसिसच्या माध्यमातून 7 जून रोजी www.incometax.gov.in हे इन्कम टॅक्सचं नवं पोर्टल मोठा गाजावाजा करीत सुरू झाले; मात्र अगदी पहिल्या दिवसापासूनच त्याच्या वापरात अडचणी येत होत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 22 जून रोजी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या अडचणी सोडविण्याच्या सूचना केल्या होत्या.

Advertisement

इन्कम टॅक्स विभागाचे हे पोर्टल वापरताना सुरुवातीपासूनच करदात्यांना अडचणी येत आहेत. मात्र, येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून हे पोर्टल सुरळीत काम करील, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्रालयाने व्यक्त केली आहे. अर्थ मंत्रालय आणि इन्फोसिस सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी या पोर्टलबद्दलचे अपडेट्स दररोज घेत आहेत.

Advertisement

केंद्र सरकारनेही नवं इन्कम टॅक्स पोर्टल वापरताना अडचणी येत असल्याचं संसदेत मान्य केलं होतं. आतापर्यंत नव्या इन्कम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलबद्दल 7000 ई-मेल्स आले असून, पैकी 2000हून अधिक तक्रारी असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं. या नव्या ई-फायलिंग वेबसाइटवर युझर्सना 90 हून अधिक प्रकारच्या समस्या येत आहेत.

Advertisement

इन्फोसिस (Infosys) कंपनीला वेबसाइट वापरताना येणाऱ्या अडचणींबद्दल सांगण्यात आलं असल्याचे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं. नव्या वेबसाइटच्या समस्या दूर करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत, असं इन्फोसिसकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून ही वेबसाइट सुरळीत चालेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement

‘भास्कर’वरील छाप्यामुळे पेटलाय देश; संसद ठप्प, पहा कोणत्या नेत्याने काय म्हटलेय ते
वाव.. आणि सापडली भन्नाट सोनेरी कलरफुल फिश; मोठाच पापलेटसारखा आहे आकार..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply