Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.. गुंतवणुकदारांसाठी संधी, आजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज (शनिवारी) मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX) सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याच्या दरात 342 रुपयांची घसरण होऊन 48,058 रुपये प्रति तोळा भाव झाला होता. या आठवड्यात ऑगस्ट महिन्यातील डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 342 रुपयांनी घसरून 48,058 रुपये झाला होता.

Advertisement

गेल्या आठवड्यात, ऑगस्टमधील वितरणासाठी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 47923 रुपयांवर बंद झाला होता. साप्ताहिक आधारावर त्यात 135 रुपयांची वाढ नोंदविली गेली. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा दर 16.40 डॉलरने (-0.90%) घसरण झाली असून ते प्रति औंस 1,812.60 इतका झाला आहे.

Advertisement

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX) चांदीच्या भावात 1336 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीची किंमत 68,345 प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीचा दर 0.687 डॉलरने (-2.60%) घसरण होऊन ते प्रति औंस 1.67 झाला.

Loading...
Advertisement

दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी (ता.16) सोन्याचा भाव 73 रुपयांनी घसरून 47,319 रुपयांवर गेला होता. तसेच चांदीही 196 रुपयांनी घसरून 68,043 रुपये प्रति किलो झाली होती.

Advertisement

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 48,273 रुपये, तर चांदीची किंमत प्रति किलो 68912 रुपये होती.

Advertisement

लंकेच्या एंट्रीने विखे गटाचीही लागणार कसोटी; झेडपी निवडणुकीच्या निकालावर ठरणार दिशा..!
पुरुष गुगलवर काय शोधतात..? संशोधनातून आली धक्कादायक माहिती, जाणून घेण्यासाठी वाचा..
पेन्शनर्ससाठी आलीय गुड न्यूज; पहा केंद्र सरकार व बँकांकडून काय सोय होणारेय तुमची..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply