पतंजलीचा आयपीओ येतोय..! गुंतवणुकदारांसाठी आलीय मोठी संधी, पाहा बाबा रामदेव यांनी काय म्हटलेय..
नवी दिल्ली : पतंजली उद्याेग समूहातील कंपन्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बाबा रामदेव यांनी कंपनीचा आयपीओ आणणार असल्याचे जाहीर केले आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेडने आपली सहकारी कंपनी ‘रुची सोया’चा एफपीओ (Ruchi Soya FPO) जाहीर केलाय.
‘एफएमसीजी’ क्षेत्रातील हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) सारख्या कंपन्यांनाही मागे टाकण्यासाठी ‘पतंजली’ तयारी करीत आहे. सध्या एचयूएल कंपनी पतंजलीपेक्षा मोठी आहे. मात्र, आम्ही 2025 पर्यंत HUL लाही मागे टाकण्याच्या योजनेवर काम करीत असल्याचे बाबा रामदेव यांनी जाहीर केले.
ते म्हणाले, की ‘पतंजली’ने मागील 5 वर्षांत 5 लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. पुढील 5 वर्षांत आणखी 5 लाख नवीन रोजगार देणार आहोत. अवघ्या 2 जणांच्या मदतीने सुरुवात केल्यानंतर 200 देशांमध्ये योग पोहोचवण्यात यशस्वी झालो.
पतंजलीने 100 पेक्षा जास्त औषधे तयार केली आहेत. रुची सोयाचा व्यवसाय वाढवून 16,318 कोटी रुपयांवर गेला आहे. रुची सोयाला 24.4 टक्के दराने वाढ झालीय. यापुढे कंपनीचे संपूर्ण संशोधन, आरोग्य, शिक्षण आणि शेतीवर लक्ष असेल. 2020-21 या आर्थिक वर्षात पतंजलीची उलाढाल सुमारे 30,000 कोटी रुपये होती.
पतंजलीने आता पौष्टिक उत्पादनांवर लक्ष केंद्रित केले आहे. महिलांच्या आरोग्य सेवांवरही जोर दिला जात आहे. आम्ही रुची सोयाला ‘एफएमसीजी’ कंपनी बनवू. आम्ही ‘रुची सोया’ यांसारख्या कंपनीकडे वळलो आहोत. आम्ही 4,300 कोटी रुपयांचा ‘एफपीओ’ घेऊन येत आहोत. या दरम्यान आम्ही पतंजलीच्या ‘आयपीओ’ची बातमी लवकरच देणार असल्याचे बाबा रामदेव यांनी सांगितले.
राज्यात खरिपाच्या पेरणीला वेग..! रासायनिक खतांबाबत कृषिमंत्री काय म्हणतात पाहा..?
MPSC / UPSC यश यावरील ब्लॉग : सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही; पहा नेमके काय म्हटलेय दिवेगावकर यांनी