Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अरे आहात ना तय्यार..! टी 20 वर्ल्डकपचे आले की वेळापत्रक; पहा कुठे होणार ही स्पर्धा..!

Please wait..

मुंबई : टी 20 वर्ल्ड कप 2021 चे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे होत आहे. यातील काही सामने ओमानमध्येही होऊ शकतात. ही स्पर्धा 1 ऑक्टोबरला सुरू होईल, तर अंतिम फेरी 1 नोव्हेंबरला होईल. मंगळवारी आयसीसीने याची घोषणा केली आहे. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड) हेच या मोठ्या स्पर्धेचे यजमान म्हणून कायम राहील.

Advertisement

Advertisement
Loading...

16 संघांची ही स्पर्धा यूएईच्या तीन शहरांमध्ये (दुबई, शारजाह आणि अबू धाबी) आणि ओमान येथे खेळली जाईल. सोमवारीच  बीसीसीआयने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) होणार्‍या टी 20 विश्वचषक स्पर्धेबाबतच्या बातमीला दुजोरा दिला होता. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की, आम्ही स्पर्धा युएईमध्ये घेत आहोत. गतवर्षी कोविड 19 च्या साथीच्या रोगाने जागतिक क्रिकेट दिनदर्शिकेमध्ये बाधा आणल्यामुळे आयसीसीने 2020 विश्वकरंडक पुढे ढकलला. तो ऑस्ट्रेलियामध्ये होणार होता. यानंतर हे निश्चित करण्यात आले की 2021 मध्ये भारतात तर, 2022 मध्ये अशा स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होतील.

Advertisement

माध्यमांच्या वृत्तानुसार राऊंड -1 मध्ये 12 सामने होणार असून 8 संघ त्यात सहभागी होतील. यातील चार (प्रत्येक गटातील शीर्ष दोन) सुपर 12 साठी पात्र ठरतील. आठ संघांपैकी क्वालिफाइड चार संघ (बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामिबिया, ओमान, पापुआ न्यू गिनी) पहिल्या आठ क्रमांकाच्या टी -20 संघात सामील होऊन सुपर 12 मध्ये प्रवेश करेल. पहिल्या फेरीत युएईच्या जागेव्यतिरिक्त ओमानमध्येही स्पर्धा होईल आणि सुपर 12 सामन्यांसाठी युएईच्या मुख्य मैदानावरील खेळपट्ट्यांना तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.
Advertisement

Leave a Reply