Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धनकवडीच्या एकाच सेंटरवर १० हजारांचे लसीकरण; पहा स्व. विलासराव तांबे आरोग्य दवाखाण्याच्या कार्याची माहिती

पुणे : कोरोनाला रोखायचे असेल तर आता लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसऱ्या लाटेसारखी विदारक परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणास जोरात चालू आहे. त्यासाठी पुणे महापालिका यांच्या धनकवडीच्या ‘स्व. विलासराव तांबे आरोग्य दवाखाना’ येथील सेंटरमध्ये लसीकरण अभियान वेगाने राबवले जात आहे. आतापर्यंत १० हजार जणांना या सेंटरमध्ये लस देण्यात आलेली आहे.

Advertisement

पुणे महापालिकेचे नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनीही यासाठी झोकून दिलेले आहे. प्रभागातील नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित करण्याच्या उद्देशाने प्रभागात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. ‘स्व. विलासराव तांबे आरोग्य दवाखाना’ येथे मार्च २०२१ मध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. धनकवडी परिसरातील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येऊ लागले. कोरोना विरुद्धच्या लढाईत लसीकरण का महत्वाचे आहे, याची माहिती देऊन नागरिकांना सजग करण्याचे कामही केले. परिणामी, नागरिकांनी सुद्धा मनातील शंका, भिती बाजूला सारत प्रतिसाद दिला, आणि त्यानंतर आज जूनमध्ये जवळपास चार महिन्यांच्या काळात दहा हजार लोकांचे लसीकरण करण्यात यश मिळाले आहे.

Advertisement

Loading...
Advertisement

लसीकरणाचा हा एक मोठा टप्पा पार केला आहे. लसीकरणाचे काम अजूनही सुरुच आहे. ते इतक्यात थांबणारही नाही. प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करुन त्यास कोरोनापासून सुरक्षित करण्याचा निर्धार तांबे यांनी केला आहे. यादृष्टीने नियोजन करुन नागरिकांचे लसीकरण करण्यावर त्यांचा भर आहे. या माध्यमातून ‘माझा प्रभाग सुरक्षित प्रभाग’ हे ब्रीदही त्यांनी खरे करुन दाखवले आहे. या कार्यात आरोग्य यंत्रणेचे तर महत्वाचे योगदान आहे. त्यामुळेच तर इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करणे शक्य झाले आहे. या कार्यात अडचणी आल्याच नाहीत असेही नाही. अडचणी सुद्धा आल्या.  मात्र, या अडचणी क्षणिक ठरल्या. समोर उभ्या ठाकलेल्या संकटाचा यशस्वी सामना करत लसीकरणाचा महत्वाचा टप्पा गाठता आला. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा, रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळे त्यांचेही योगदान विसरता येणार नाहीच. याची जाणीव ठेवत नगरसेवक तांबे यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.

Advertisement

केवळ कोरोना आला म्हणून लसीकरणच नाही तर प्रभागातील कोणत्याही समस्या असोत, नागरिकांच्या जिव्हाळ्याचा कोणताही प्रश्न असो, प्रभागाचा आणि त्या बरोबरच शहराच्या विकासाचा मुद्दा असो, तांबे नेहमीच आघाडीवर असतात. प्रभागातील विविध विकासकामे, नुतनीकरणाची कामे यांची प्रत्यक्ष पाहणी करतात. नागरिकांना काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करतात. जेणेकरुन नागरिकांत विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. आपल्या प्रभागाचा विकास होईल, याच दृष्टीने तांबे यांचा विचार असतो, आणि त्यानुसारच ते सातत्याने प्रयत्न करत असतात.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply