Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून भारताचा विकासदर राहणार कमी; पहा नेमके काय म्हटलेय ‘बार्कलेज’ने

मुंबई : देशात करोना विषाणू आल्यापासून संकटेच संकटे येत आहे. या घातक विषाणूने देशाचे मोठे नुकसान केले आहे. अर्थव्यवस्थेस फटका बसला. देशातील व्यापारास कोट्यावधींचा फटका बसला. उद्योग-व्यवसाय बंद पडले. गरीबी वाढली. लाखो लोक बेरोजगार झाले. राज्यांचे महसूल घटले, अशी अनेक संकटे या काळात आली. याचा परिणाम देशाच्या विकासावर होणारच नाही, असे आजिबात नाही. कारण, आता जे अहवाल येत आहेत. त्यातून देशाचा विकास दर कमी राहणार असल्याचेच सांगण्यात येत आहे.

Advertisement

ब्रिटनच्या ‘बार्कलेज’ या संस्थेने २०२२ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दरात ०.८२ टक्के घट केली आहे. या संस्थेच्या मते करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्याने भारताचा विकास दर ९.२ टक्के इतका राहण्याचा अंदाज आहे. बार्कलेजचे अर्थतज्ज्ञ राहुल बाजोरिया यांनी सांगितले, की देशात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. तसेच अनेक राज्यांनी लॉकडाउन केल्याने विकास दर घटणार आहे. देशात आता दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यांनी लॉकडाउन केले होते, त्याचा प्रतिकूल परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. या कारणामुळेच आम्ही २०२१-२२ या आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा वेग ०.८२ टक्क्यांनी घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थेच्या अहवालात असेही म्हटले आहे, की २०२१ या वर्षाच्या अखेरपर्यंत लॉकडाउन सारखे निर्बंध समाप्त होतील, असे अपेक्षित आहे. २०२१ या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेस किमान ५.३८ लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.

Loading...
Advertisement

देशात लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. लसींची कमतरता असल्यानेच असे होत आहे. सप्टेंबर तिमाही मध्येच परिस्थितीत सुधारणा होणार आहे. लसीकरण संथ गतीने होत असल्याने याचाही परिणाम होण्याची शक्यता आहे. जर देशात करोनाची तिसरी लाट आलीच तर किमान आठ आठवड्यांचा लॉकडाउन करण्याची आवश्यकता राहिल. त्यामुळे जीडीपीत वाढ आणखी घटेल. या काळात हा दर ७.७ टक्क्यांवर येईल, असे  या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, करोनाच्या पहिल्या लाटेत देशव्यापी लॉकडाउन केला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला. मात्र, दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारने लॉकडाउन केला नाही. राज्यांनी मात्र लॉकडाउन केला काही राज्यांनी निर्बंध कठोर केले. त्याचा परिणाम झाला आहे. या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply