Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भाजपच्या भातखळकरांनी केला ‘तो’ घोळ; ‘गुगल जाहिराती’च्या मुद्द्यावरही सेनेला केले लक्ष्य, पहा युझर्स काय म्हणतात ते

मुंबई : राजकीय क्षेत्रात मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला भारतीय जनता सर्वज्ञानी समजते. मात्र, त्याचवेळी त्याचा अभ्यास, कुवत आणि एकूण आवाका लक्षात न घेता अनेक नागरिकांना आणि त्यातही मुख्य म्हणजे आमदारांना तसेच वाटते. आताही टीका करताना कोणत्याही मुद्द्याला हात घालण्याच्या नादात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक वेगळाच घोळ केला आहे. त्यांनी एका ‘गुगल जाहिराती’च्या (Google Online Advertising) मुद्द्यावर थेट शिवसेनेला हिंदुत्ववादी मुद्दा सोडण्याची सूचना करून टाकली आहे.

Advertisement

शिवसेना या राजकीय पक्षाने आपला जुना मित्र असलेल्या भाजपला वाकुल्या दाखवत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्याशी हातमिळवणी करून टाकली आहे. त्यामुळे भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेतून बाजूला राहावे लागले आहे. याची बोच भाजप नेत्यांच्या प्रत्येक मुद्दा व वाक्यातून दिसत असते. आताही टीका करताना थेट काहीही मुद्दा हाती लागत नसल्याने आजचा दिवस ढकलण्यासाठी भातखळकरांनी थेट सामना या शिवसेना मुखपत्राच्या ऑनलाइन जाहिरातीचा एक स्क्रीनशॉट काढून टीका केली आहे.

Advertisement

सामानाच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये ख्रिश्चन धर्मीय संस्थेच्या जाहिराती दाखवल्या जात असल्याकडे भातखळकरांनी लक्ष वेधले आहे. Jesus Prayer Salvation च्या जाहिराती सामानावर दाखवल्या जात असल्याचा स्क्रीनशॉट काढून भातखळकरांनी म्हटले आहे की, शिवसेनेने आता हिंदूंच्या धर्मांतराच्या जाहिराती सामनातून झळकवल्यानंतर आता हिंदुत्ववादी असल्याचे पोकळ दावे करणे बंद करावे. ट्विटरवर असे लिहितानाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्यालय आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही हे टॅग केले आहे.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “शिवसेनेने आता हिंदूंच्या धर्मांतराच्या जाहिराती सामनातून झळकवल्यानंतर आता हिंदुत्ववादी असल्याचे पोकळ दावे करणे बंद करावे. @OfficeofUT @rautsanjay61 https://t.co/4YFnesqYhu” / Twitter

Advertisement

कोणत्याही ऑनलाइन न्यूज पोर्टल किंवा वेबसाईटवर गुगल कंपनीतर्फे जाहिराती दाखवण्याची सोय असते. त्यासाठी गुगलकडे अर्ज करून अशा जाहिरातीसाठी पात्र असलेल्या न्यूज पोर्टलला जाहिराती दिल्या जातात. ‘सामना’वरही अशा जाहिराती दिसतात. तिथे कोणत्या जाहिराती दिसतात यावर संबंधित माध्यम समूहाचे कोणतेही नियंत्रण नसते. उलट, संबंधित युझरने गुगल किंवा कोणत्याही सर्च इंजिन व वेबसाईटवर जाऊन सर्च केलेल्या मुद्द्याच्या जाहिराती दिसतात. त्याच ‘सामना’चा काहीही हात नसलेल्या मुद्द्यावर भातखळकरांनी शिवसेना पक्षावर टीका करून दाखवली आहे.

Loading...
Advertisement

यावर आफ्टरनून व्हाईसचे पत्रकार आकाश रेडीज यांनी म्हटले आहे की, त्या वेबसाईटवरच्या टाकलेल्या जाहिराती नाहीत. उलट युझर्सने यापूर्वी सर्च केलेल्या किंवा गुगलमध्ये जाऊन विचारलेल्या प्रश्नाशी अनुषंगाने जाहिराती दाखवलेल्या आहेत. अमेय सावंत यांनी यावर लक्ष वेधताना म्हटलेय, अहो ट्विट डिलीट करा, हसतील सगळे. मित्र परिवारात कॉम्पुटर शिकलेले कोणीतरी असेलच, ते पण सांगतील तुम्हाला. वेबसाईट आणि जाहिरातीचा काही संबंध नसतो..गूगल ॲडसेंस लावते. ते पण साईट पाहणाऱ्याच्या ॲक्टीव्हीटी ट्रॅक करून.. ती जाहिरात सामानाच्या नाही, तुमच्या ॲक्टिविटी नुसार दिसतेय.

Advertisement

Akshay Redij on Twitter: “@BhatkhalkarA @OfficeofUT @rautsanjay61 This has nothing to do with the website running Google Adsense. The ads you see depends on your search history, previous search queries, types of websites you visit. For your reference: https://t.co/X1eSG6sUE9” / Twitter

Advertisement

कृष्णा औटी यांनी म्हटलेय की, आम्हाला वाटायचं सोशल मीडिया वापरताना याच ज्ञान घेतलं असाल तुम्ही.. अहो साहेब ह्या advertise तुमच्या search history , browsing history वर अवलंबून असतात.. तुम्ही जे बघाल ते artificial intelligence द्वारा त्याचा related सर्व तुम्हाला दिसत राहील.. गूगलला प्रश्न करा..ही add का दाखवता.. सौमित्र यांनी ‘थोडं Google AdSense काय प्रकार असतो ते आधी समजून घ्या, पुन्हा असलं काही ट्वीटण्या अगोदर…’ अशी सूचना केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply