Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण व मोदींच्या बॉलीवूड कनेक्शनवर काँग्रेसने केलाय हल्लाबोल; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनाच वेळ न देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आता कॉंग्रेस पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याचं वाटल्याने मोदीजी संभाजीराजेंना भेटले नसल्याचे म्हटल्यावर काँग्रेस पक्षाने आणखी एकदा टीका केली आहे.

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “चंद्रकांत दादा, प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. https://t.co/RsCxq6EyE8” / Twitter

Advertisement

कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे.

Loading...
Advertisement

एकूणच पंतप्रधान मोदी यांना बॉलीवूड कलाकारांना भेटण्यासाठी मुबलक वेळ असताना सामाजिक मुद्द्यावर चर्चा निन्वा संवाद करण्यासाठी त्यांना वेळ नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. त्यावर आता महाराष्ट्र भाजपचे नेते प्रत्युत्तर देतात की थेट मोदीजी याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणा-या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे. https://t.co/L9I3AC664C” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply