Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भजी-समोस्याच्या तेलावर उडणार विमान; पहा नेमके काय टेक्निक वापरले जाणार त्यासाठी

मुंबई : भजी व समोसा खाताना तो जास्त तेलकट असणार नाही याची काळजी आपण घेतो. कारण, त्या तेलापेक्षा तळलेला समोसा किंवा भजी आपल्याला खायचे असतात. मात्र, भजी-समोसा तळून उरलेले तेलही खाऊ नका किंवा ते पुन्हा वापरू नका असा हेल्थ ट्रेंड आलेला आहे. मग अशा तेलाचे काय करायचे असा प्रश्न असेल तर, त्याचे उत्तर मिळाले आहे. कारण, त्या उरलेल्या तेलावर आता चक्क विमान उडणार आहे. होय, या तेलाचे आता विमानाचे इंधन (aviation fuel) बनणार आहे.

Advertisement

फिनलंडची नेस्ते ओवायजे ही कंपनी नूतनीकरणायोग्य डिझेल तयार करणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. त्यांनी लो-कार्बन जेट फ्यूलसाठी नवे पर्याय आणण्याची तयारी केली आहे. एसएएफ कार्बन उत्सर्जन कमी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या एअरलाइन्ससाठी कंपनीने आता खराब आणि वापरलेले कुकिंग ऑइलचा (cooking oil) पर्याय आणण्याची तयारी केली आहे.

Loading...
Advertisement

सस्टेनेबल जेट फ्युएल (jet fuel business) निर्मितीसाठी १६,०० कोटी रुपयंाची गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीने केली आहे. सिंगापूरच्या कारखान्यात विस्तारानंतर कंपनी २०२३च्या अखेरीस संयुक्त रूपात आपले एसएएफ उत्पादन सध्याच्या क्षमतेच्या १००,००० लाख टनांवरून वाढून १५ लाख टन वार्षिक इतके करणार आहे. पारंपरिक जीवाश्मआधारित केरोसीनच्या तुलनेत या नव्या इंधनामुळे ८०% पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी होईल असे कंपनीचे म्हणणे आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply