Take a fresh look at your lifestyle.

काउ कडलिंग : त्यासाठी गायींना आलेय खूपच आर्थिक महत्वही; पहा नेमके काय होत आहे करोना पिरीयडमध्ये

मुंबई : भारतीयांचे गाय या प्राण्याविषयीचे प्रेम जगजाहीर आहे. अगदी गाय महत्वाची समजून मनुष्याचे जीवन संकटात आणण्याचेही ‘पुण्यकर्म’ अनेक भारतीयांच्या नावावर आहे. काहींनी करोना कालावधीत गायीचे शेण आणि आणि गोमुत्र यांचा वापर रामबाण इलाज म्हणून केल्याचेही दावे केले आहेत. भारतात याबाबत मतभेद असतानाच अमेरिकेत आता करोना कालावधीत गायींना महत्व आलेले आहे.

Advertisement

आपणास सलग आठवडाभर तणाव असेल किंवा दीर्घकाळापर्यंत उदासीनता वाटत असेल तर निष्पाप प्राण्याच्या स्पर्शाने मानवी मनाला खूप आराम मिळतो. सामान्यत: पाळीव प्राणी घरी असल्यावर अनेकांना याचा फील येतो. त्यामुळेच व्यावसायिक प्रशिक्षित सेवा किंवा थेरेपी डॉग हेदेखील याचे एक उदाहरण आहेत. आता कुत्री आणि लहान प्राण्यांपेक्षा गायींना मिठी मारून मनाला आल्हाददायक वाटणे हे खूप लोकप्रिय झाले आहे. भारतात ग्रामीण भागात गायींवरून हात फिरविणे सामान्य आहे. परंतु, अमेरिकेतील लोक यासाठी आता चक्क पैसे खर्च करण्यास तयार आहेत.

Advertisement

या वेलनेस ट्रेंडला ‘काउ कडलिंग’ (Cow cuddling) असे नाव देण्यात आले आहे. अशा प्रकारे तणाव आणि चिंता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. असे मानले जाते की ही नेदरलँड्समधील थेरपी म्हणून ओळखली जाते. अमेरिकेत कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारात वाढ झाल्यावर मानव एकमेकांना मिठी मारू शकत नाहीत. अशावेळी आता हा नवा वेलनेस ट्रेंड आलेला आहे.

Advertisement

The News with Shepard Smith on Twitter: “Did you know that cow cuddling is a growing wellness trend? CNBC’s @janewells has more. https://t.co/WcynuhXMNw” / Twitter

Advertisement

हवाई बेटे, न्यूयॉर्क, टेक्सास आणि लॉस एंजेलिसमध्ये अमेरिकेत ही थेरपी खूप लोकप्रिय होत आहे. त्यात गायी लोकांवर प्रेम करतात. काही ठिकाणी लोक एका तासासाठी 200 डॉलर्सपर्यंत यासाठी पैसे देत आहेत. या पैशाने रेस्क्यू मोहिमेत वाचवलेल्या गोवंशाची काळजी घेण्यात येत आहे. एखाद्या एक्झिटोसिन संप्रेरकाच्या प्राण्याचे आलिंगन आराम आणि शांतीची भावना उत्पन्न करते. त्याचा परिणाम प्राण्यांमध्येही दिसून आला आहे. 2007 मध्ये अ‍ॅप्लाइड अ‍ॅनिमल अ‍ॅटिव्हल सायन्स जर्नलमधील अभ्यासातही त्याबाबत लिहिलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply