‘त्या’ महत्वाच्या मुद्द्यावर ‘महाविकास’मध्ये खडाजंगी; राऊत झाले आक्रमक, अजितदादांवर प्रश्नांचा भडीमार
मुंबई : आरक्षण हा मुद्दा वंचितांना प्रतिनिधित्व देण्याच्या मुद्द्यावरून आता थेट गरिबी निर्मुलन या मुद्द्याशी जोडण्यात राजकारण्यांना यश आलेले आहे. त्यामुळेच याप्रकरणी समाजातील प्रत्येक घटक आक्रमक आहे. अशावेळी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे. त्यावरून आता या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाचे बुधवारी पदोन्नती आरक्षण उपसमितीच्या बैठकीत संतप्त पडसाद उमटले आहेत. उपसमितीशी चर्चा न करता पदोन्नती आरक्षण मागे घेण्याचा शासन निर्णय घेतल्याकडे आणि सर्वोच्च न्यायालयाची हरकत नसताना पदोन्नती आरक्षणाचा निर्णय अचानक फिरवण्याच्या मुद्द्यावर कॉंग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली. याप्रकरणी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री थेट अजित पवारांनाच धारेवर धरले. काँग्रेस-राष्ट्रवादीतील सुप्त संघर्ष यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे.
अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, समिती सदस्य ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, किशोर राजेनिंबाळकर आदि या बैठकीस उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी महाधिवक्त्यांच्या अभिप्रायाचा दाखला देऊन म्हटले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ‘पदोन्नतीमधील आरक्षण देता येणार नाही’ असा जून २०१८ मध्ये महाधिवक्ता यांनी अभिप्राय दिला होता. त्यानुसार ७ मे रोजीचा शासन निर्णय जारी केला.
एकूण मराठा आरक्षणाचा दबाव आणि मंत्री राऊत हे याप्रकरणी एकटे पडणार असल्याने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतलेला दोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयात बदल होण्याची शक्यता नाही. मात्र, यानिमित्ताने दोन महत्वाच्या मंत्र्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटली आहे.
संपादन : संतोष शिंदे
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.