Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दीडच महिन्यात बसलाय लाखो कोटींचा फटका; पहा नेमका कोणत्या राज्याचा आहे पहिला नंबर

मुंबई : देशात करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट आधिक घातक सिद्ध होत आहे. पहिल्या लाटेत लॉकडाउनमुळे जसे नुकसान झाले तसेच नुकसान दुसऱ्या लाटेतही सहन करावे लागत आहे. या लाटेचाही अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला आहे. लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. लॉकडाउन आणि कठोर निर्बंधांमुळे देशांतर्गत व्यापारासही जबरदस्त फटका बसला आहे.

Advertisement

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रविण खंडेलवाल यांनी सांगितले, की करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड महिन्यात देशांतर्गत व्यापारास तब्बल १२ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. संघटनेच्या मते दीड महिन्यात हे फार मोठे नुकसान आहे, आणि आता यातून बाहेर येणे सुद्धा कठीण होणार आहे. दरवर्षी देशात १ लाख १५ हजार कोटी रुपयांचा व्यापार होतो. देशात जवळपास ८ कोटी लहान मोठे व्यापारी आहेत.

Advertisement

संघटनेने आधिक स्पष्ट करताना म्हटले आहे, की देशांतर्गत या व्यापारी नुकसानीमध्ये किरकोळ व्यापारात ७.५० लाख कोटी आणि घाऊक व्यापारात जवळपास ४.५० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातस १.१० लाख कोटी, उत्तर प्रदेश ६५ हजार कोटी, गुजरात ६० हजार कोटी, कर्नाटक ५० हजार कोटी, दिल्ली आणि मध्य प्रदेश प्रत्येकी ३० हजार कोटी, राजस्थान २५ हजार कोटी आणि छत्तीसगड राज्यास २३ हजार कोटी रुपये नुकसान झाले आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, देशात पहिल्या लाटेतही अशीच परिस्थिती होती. दुसऱ्या लाटेत मात्र परिस्थिती आधिकच गंभीर बनली आहे. कडक निर्बंध असल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. राज्यांचा महसूल घटला आहे. राज्यांत रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. आता तर निर्बंध आधिक कडक करण्यात येत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात नुकसान वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply